शुक्रवार, 24 जानेवारी 2025
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. लोकप्रिय
Written By
Last Modified: सोमवार, 18 मे 2020 (12:01 IST)

स्त्री-पुरुषांमधील संबंध कोरोना व्हायरसमुळे होत आहे प्रभावित

कोरोना व्हायरसमुळे लोकांच्या जीवनशैलीत परिवर्तन आले असून यामुळे लोकांच्या मानसिक आणि शारीरिक आरोग्यावर परिणाम होत आहे. यामुळे लोकांच्या व्यवहारात परिवर्तन दिसू लागलं आहे. कोरोनामुळे रिलेशनशिपमध्ये बदल दिसून आल्याचे एका स्टडीमध्ये समोर आले आहे. या दरम्यान स्त्रियांची संबंध ठेवण्याची इच्छेत वाढ असली तरी संबंधात गुणवत्तेत कमी झाल्याचे कळून येत आहे. 
 
इंटरनॅशनल जर्नल ऑफ गायनोकोलॉजी ऍड ऑब्स्टेट्रिक्स यात प्रकाशित शोधाप्रमाणे या काळात महिलांनी इतर दिवसांच्या तुलनेत अधिक वेळा संबंध स्थापित केले आहेत. तरी या दरम्यान अनेक महिला आता गर्भवती होऊ इच्छित नाही. पण हैराण करणारा तथ्य म्हणजे या काळात गर्भनिरोधक वापर कमी झाला आहे.
 
या पूर्वी संयुक्त राष्ट्राच्या अध्ययनामध्ये सांगण्यात आले होते की लॉकडाउनमध्ये इच्छा नसूनही 70 लाख महिला गर्भवती होऊ शकतात. यूएनएफपीएने एप्रिलच्या शेवटल्या आठवड्यात म्हटले होते की मुख्य आरोग्य सेवा बाधित असल्यामुळे निम्न आणि मध्यम आय असणार्‍या देशांमध्ये सुमारे पाच कोटी महिला आधुनिक गर्भनिरोधकांच्या वापरापासून वंचित राहू शकतात ज्यामुळे पुढील काळात अवांछित गर्भधारणेचे 70 लाख प्रकरण समोर येऊ शकतात. 
 
यूएन अध्ययनाप्रमाणे निम्न आणि मध्यम आय असणार्‍या 114 देशांमध्ये सुमारे 45 कोटी स्त्रिया गर्भनिरोधक वापरतात. सहा महिन्यांहून अधिक वेळापर्यंत लॉकडाउन संबंधित समस्यांमुळे या देशांतील सुमारे 4.70 कोटी महिला गर्भनिरोधकांच्या वापरापासून वंचित राहू शकतात. आणि याच कारणामुळे गर्भधारणेचे 70 लाख अतिरिक्त प्रकरण समोर येऊ शकतात.