शनिवार, 11 जानेवारी 2025
  1. मराठी ज्योतिष
  2. वास्तुशास्त्र
  3. वास्तुसल्ला
Written By अनिरुद्ध जोशी|

गृहकलह टाळण्यासाठी या 5 वास्तू टीप्सचे अनुसरण करा

angry
1 लादी पुसून काढावी-  तुरटीच्या पाण्यात सैंधव मीठ टाकून घरातील लादी पुसून काढावी. किंवा सैंधव मिठाच्या पाण्यात थोडं लिंबाचा रस आणि कापूर टाकावे. ह्या पाण्याने सर्व घरात पुसून काढावे. आपण स्वछतागृह आणि स्वयंपाकघरात देखील हे पाणी वापरू शकता. स्वच्छतागृहात मीठ किंवा तुरटीने भरलेली वाटी ठेवावी. दर महिन्यात या वाडग्यातले मीठ किंवा तुरटी बदलावी. अशी आख्यायिका आहे की हवेमधील आद्र्तेबरोबरच मीठ आजूबाजूच्या सगळ्या नकारात्मक ऊर्जा शोषून घेते. त्यामुळे सकारात्मकतेची पातळी वाढते.
 
2 दारं आणि खिडक्या - तुरटीमध्ये अँटी-बॅक्टेरियाचे गुणधर्म आहेत. खिडक्या, दारं, बाल्कनीमध्ये कापूर आणि तुरटीचे बारीक खडे ठेवल्याने वास्तू दोष तर जातंच त्याच बरोबर नकारात्मक ऊर्जा घरात येत नाही.
 
3 उदबत्ती लावावी - हिंदू धर्मात 16 प्रकाराच्या उदबत्त्यांचं महत्त्व आहे. अगर, तगर, शैलज, नागरमोथा, चंदन, नाखनखी, मुशीर, जटामांसी, कापूर, ताली, सदलन, गुग्गुळ आणि कुष्ठरोग या शिवाय इतर मिश्रण ही घालावे. ह्यात आंबा, कडुलिंबाची सालं घालून धूप दिले जाते किंवा ह्या सर्व साहित्यांना शेणाच्या गवऱ्या जाळून त्यावर टाकून संपूर्ण धुराळ घरात द्यावे असे केल्यास घरात आणि मनात शांती मिळते दुःख आणि शोकांचा नायनाट होतो. गृहकलह, पितृदोष आणि अघटित काहीच घडत नाही. घरातील नकारात्मक ऊर्जा नाहीशी होते, वास्तुदोष दूर होऊन कुंडलीत असलेले ग्रहदोष पण दूर होतात.
 
4 कापूर लावावा - घरात दररोज सकाळ संध्याकाळी कापूर लावणे शुभ मानले जाते. कापूर घरातील नकारात्मक ऊर्जेला दूर करून घरात सकारात्मक ऊर्जेचं प्रसरण करतं. शरीरं आणि मन शुद्ध होते. सर्व ताण तणावांपासून मुक्तता होते. शास्त्रानुसार घरात कापूर पेटवल्याने अक्षय पुण्याची प्राप्ती होते. कापूर जाळल्यामुळे देवदोष, कालसर्पदोष आणि पितृदोष सारखे दोषांचे शमन होते. घरात सकारात्मक उर्जेसाठी आणि शांती मिळविण्यासाठी दररोज सकाळ संध्याकाळ तुपामध्ये कापूर भिजवून जाळल्याने त्याचा सुवासामुळे घरातील नकारात्मकता दूर होऊन घरात शांती राहील. घरातील कुठल्या स्थळी वास्तुदोष असल्यास त्या जागी कापराच्या 2 वड्या ठेवून द्या त्या संपल्यावर अजून 2 ठेवून द्या असे केल्याने वास्तुदोष नाहीसा होतो. 
 
घरातील कलह टाळण्यासाठी हे करावे...
1 हसऱ्या कुटुंबाचे छायाचित्रे लावा - घरात हसणाऱ्या कुटुंबाची छायाचित्रे आणून अतिथी कक्षामध्ये लावावी. आपल्याला कोण्या दुसऱ्या कुटुंबाचे छायाचित्र लावायचे नसेल तर आपण स्वतःच्या कुटुंबाचा एखादं छायाचित्र देखील दक्षिण पश्चिम दिशेच्या कोपऱ्यात लावू शकता. ह्यामध्ये आपल्या कुटुंबातील सर्व सदस्य पाहिजेत आणि त्यांचे चेहरे आनंदित असायला हवे.
 
2 जर का पती-पत्नीमध्ये तणावाची स्थिती निर्माण झाली असेल आणि आपल्या मध्ये काहीही कारणांस्तव प्रेम संबंध निर्माण होत नसल्यास आपल्या झोपेच्या खोलीत राधा-कृष्णाचे एक सुंदर चित्र लावावे.
 
3 काही कारणास्तव राधा-कृष्णाचे चित्र लावू शकत नसल्यास हंसाच्या सुंदर जोडीचे चित्र लावावे.
 
4 या शिवाय हिमालय, शंख किंवा बासरीची चित्रे देखील लावू शकता. लक्षात ठेवा, वरील पैकी कोणतेही एक चित्रेच लावायची आहे.
 
5 झोपण्याची खोली आग्नेयकोणी असल्यास पूर्व-मध्याच्या भिंतीवर शांत सागराचे चित्र लावू शकता.
 
6 झोपण्याचा खोलीत कधीही पाण्याचे चित्र लावू नये हे पती पत्नी आणि ती चे संकेत देतात.