शुक्रवार, 8 नोव्हेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. राष्ट्रीय
Written By
Last Modified: गुरूवार, 21 मे 2020 (15:41 IST)

पाकिस्तानहून सीआरपीएफच्या महिला जवानला फोन आला, माहिती द्या आणि जेवढी हवी तेवढी किंमत घ्या

पाकिस्तानमधील एका व्यक्तीने सीआरपीएफच्या महिला शिपायाला व्हॉट्सअॅप कॉल केला आहे. प्रथम व्यक्ती म्हणाली, फोन डिसकनेक्ट करू नका, लॉटरीबद्दल बोलायचे आहे. यानंतर तो म्हणाला, त्याचे इतर बरेच फायदे आहेत. आपण आपल्या कॅम्पस आणि फोर्सबद्दल माहिती दिली तर आम्ही तुम्हाला जेवढी हवी तेवढी किंमत देऊ.
 
आम्हाला तुमच्याविषयी काहीही माहिती नाही असे समजू नका. आम्हाला सर्वांना माहीत आहे की तु्म्ही यूपीच्या आहात. मी कराचीहून बोलत आहे. फोन कापण्यापूर्वी ती व्यक्ती म्हणते की आम्ही आत्ता काम सांगत नाही, आधी तू तुझी मागणी सांग.
 
सीआरपीएफने दिल्ली पोलिसांकडे याबाबत तक्रार केली आहे. हा विषय थेट राष्ट्रीय सुरक्षेशी संबंधित असल्याने हे प्रकरण विकासपुरी पोलिस ठाण्याने स्पेशल सेलकडे सोपविले आहे.
 
दिल्ली पोलिसांच्या सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, सीआरपीएफची महिला कॉन्स्टेबल विकासपुरीतील दिल्ली सशस्त्र पोलिस ‘डीएपी’ कँप्समध्ये संतरीच्या ड्यूटीवर होती. दोन दिवसांपूर्वी तिला 923055752119 या क्रमांकावर व्हाट्सएप कॉल आला. तो माणूस म्हणाला, "तुमच्याशी काही बोलायचे आहे आणि लॉटरीबद्दल काहीतरी सांगायचे आहे." पहा, फोन डिसकनेक्ट करू नका.
 
आमच्या जवळ इतरही बरेच फायदे आहेत. आपल्या फोर्स आणि कँप्समध्ये जे काही घडते, कृपया तेथे चालणार्या सर्व क्रियाकलापांबद्दल आम्हाला माहिती द्या. आम्ही तुम्हाला त्याची किंमत देऊ. आमच्याकडे तुमची प्रत्येक डिटेल आहे, तुम्ही उत्तर प्रदेशच्या बागपतचे रहिवासी आहात; मी कराचीहून बोलत आहे.
 
आम्ही आत्ता तुम्हाला कोणतेही काम सांगत नाही. प्रथम आपण फक्त आपली किंमत सांगा. सूत्रांनी सांगितले की महिला सैनिक ही फेसबुक इत्यादी सोशल मीडियावर नाहीत. तिच्याकडे जी सिम आहे ती बागपतची आहे. दिल्ली पोलिसांचे स्पेशल सेल आता या प्रकरणाचा तपास करत आहे.
 
सैन्याने ऍडवायझरी जारी केले होते
गेल्या वर्षी नोव्हेंबरमध्ये, भारतीय सैन्याने आपल्या सर्व जवानांसाठी व्हॉट्सअॅापवर एक ऍडवायझरी जारी केला होता. असं म्हणतात की सर्व सैनिकांनी त्यांच्या व्हॉट्सअॅप अकाउंटची सेटिंग्स त्वरित बदलावी.
 
यामुळे कोणत्याही पाकिस्तानी जासूस त्यांना कोणत्याही ग्रुप मध्ये समाविष्ट करू शकणार नाहीत. त्या काळात पाकिस्तानशी संबंधित व्हॉट्सअॅनप ग्रुपवर भारतीय लष्कराच्या जवानांचा व्हॉट्सअॅलप नंबर जोडला गेला होता लष्क. मात्र यामध्ये शिपायाची कोणतीही सहमती नव्हती.
 
त्यानंतर लष्कराने व्हॉट्सअॅपपची सेटिंग बदलण्याची सूचना केली होती. गेल्या वर्षी जुलैमध्ये आयबीने भारतीय लष्कर अधिकार्यांना आणि त्यांच्या कुटुंबीयांना कोणत्याही संशयित व्हॉट्सअॅप ग्रुपविरुद्ध सतर्क राहण्याचे निर्देश दिले होते.
 
विशेष खबरदारी घेण्याचे आदेश देताना सैन्याने म्हटले होते की अधिकारी-सैनिकांनी त्यांची गोपनीयता उघड करणे टाळले पाहिजे. ते कोणत्याही व्हॉट्सअॅाप ग्रुपचा भाग नसावेत, जे त्यांच्या विश्वासार्हतेला धोका देत आहेत. यामुळे लष्करी दलांची गोपनीयता लीक होण्याचा धोका असतो.