शनिवार, 20 एप्रिल 2024
  1. लाईफस्टाईल
  2. सखी
  3. सप्तरंग
Written By

Benefits Of Toothpaste: टूथपेस्टचे हे फायदे जाणून व्हाल हैराण

सहसा टूथपेस्टचा वापर आपण दात स्वच्छ करण्यासाठी करीत असतो. पण आपल्याला माहीत नसेल की टूथपेस्टचा वापर निव्वळ दात स्वच्छ करण्यासाठीच नव्हे तर अजून पण खूप कामी येऊ शकते. जर आपल्याला ठाऊक नसेल तर मग जाणून घ्या. टूथपेस्टचे हे आगळे वेगळे उपयोग...
 
* चेहऱ्यावर मुरूम असल्यास आपण टूथपेस्टचा वापर करून ते घालवू शकता. आपल्या एवढेच करावयाचे आहे की मुरुमांवर थोडी टूथपेस्ट लावून काही तासांसाठी ठेवावे किंवा लावून झोपावे. सकाळी उठून आपला चेहरा धुऊन घ्यावा. काही दिवस असे केल्यास मुरूम नाहीसे होतील.
 
* हे ऐकायला फार वेगळं असलं तरी हा एक प्रभावी उपाय आहे. टूथपेस्ट आपल्या नखांवर लावा. आता कापसाच्या मदतीने हळुवार चोळा. काहीच क्षणात आपले नख स्वच्छ होतील.
 
* ज्या ठिकाणी मेंदी लावली आहे त्या भागास टूथपेस्ट लावून हळुवार चोळा. नंतर ओलसर कापड्याने हात आणि पाय स्वच्छ करा दिवसातून 2 वेळा ही क्रिया करा. असे केल्याने मेंदी लवकर सुटेल.
 
* त्वचेचा काही भाग भाजला असल्यास त्याची जळजळ कमी होत नसल्यास, टूथपेस्ट सारखे दुसरे विकल्पच नाही. पेस्ट भाजलेल्या जागी लावल्यावर जळजळ कमी होईलच आणि फोड होण्याची भीती राहणार नाही. 
 
* काचेच्या टेबलावरील चहाच्या कप ठेवण्याचे डाग पडले असतील तर ते पुसण्यासाठी टूथपेस्ट चा वापर करा. डाग लगेच नाहीसे होतात.
 
* टूथपेस्ट आपल्या सौंदर्याला वाढविण्याचे काम देखील करतं. या मध्ये लिंबू मिसळून फेसपॅक सारखे लावल्याने त्वचा उजळते. या शिवाय भाजलेली त्वचा, सुरकुत्या, आणि गडद वर्तुळ (डार्क सर्कल्स ) कमी करण्यासाठी वापरले जाऊ शकतं.
 
* आपले दागिने काळवंडले आहे आणि आपल्याला ते उजळवायचे आहेत तर त्यासाठी टूथपेस्ट चा वापर करावा. हे आपल्या दागिन्यांना स्वच्छ करून उजळेल. याने हिऱ्यांच्या दागिन्यांची चकाकी देखील वाढते.
 
* घरात दुधाच्या भांड्यातून वास घालवायचा असल्यास आणि लहान मुलांच्या दुधाच्या बाटलीला स्वच्छ करावयाचे असल्यास त्या भाड्यामध्ये थोड्या प्रमाणात टूथपेस्ट मिश्रित पाणी टाकून खळखळ चांगले धुऊन घ्या. असे केल्याने भांड्यामधून दुधाचा वास निघून जाईल.