शनिवार, 25 जानेवारी 2025
  1. लाईफस्टाईल
  2. सखी
  3. सौंदर्य सल्ला
Written By
Last Modified: गुरूवार, 4 जून 2020 (22:47 IST)

Orange Face pack : संत्र्याच्या सालीपासून मिळवा तजेल त्वचा

संत्री खाण्यात जेवढे चविष्ट लागतात तितकेच हे गुणवर्धक आणि आरोग्य आणि सौंदर्य वाढविण्यासाठी फायदेशीर असत. आपण संत्री खाऊन जर का साली फेकत असाल तर हे कळल्यावर नक्कीच त्याचा फायदा घ्याल. कारण संत्र्याची सालं आपल्या सौंदर्यात वाढ करतात. 
 
1 संत्र्यांच्या साली वापरण्याचा आधी त्यांना वाळवून आपण कोरडी पावडर बनवू शकता किंवा याचे पेस्ट बनवून देखील वापरू शकता. ही पेस्ट चेहऱ्याला लावून ठेवल्याने त्वचे वरील मुरूम आणि डाग नाहीसे होतात.
 
2 संत्रीच्या सालीचे पावडर चांगले आणि पौष्टिकतेने समृद्ध असलेल्या स्क्रॅबचे काम करतात. यामध्ये गुलाबजल टाकून पेस्ट बनवून चेहऱ्याला वर काही वेळ ठेवावे आणि स्क्रब करत स्वच्छ करावं. त्वचा कोरडी असल्यास आपण कच्चं दूध देखील वापरू शकता.
 
3 चकाकत्या त्वचेसाठी संत्र्यांची सालीचे पॅक आणि स्क्रब हा उत्तम मार्ग आहे. हे त्वचेला नैसर्गिक तजेल करतं ह्याचे काहीही दुष्परिणाम होत नाही.
 
4 आपली इच्छा असल्यास आपण संत्रीच्या सालीं आणि रसाला मिसळून पेस्ट करू शकता हे आपल्या त्वचेला एक सारखं करून त्वचेला ओलसर ठेवत. 
 
5 उन्हात त्वचा काळवंडली असल्यास संत्र्यांच्या सालीचे पॅक बनवून लावल्याने त्याचा परिणाम कमी होईल. एकदा तरी हे करून बघावं. हा एक चांगला उपाय आहे.