गुरूवार, 18 एप्रिल 2024
  1. लाईफस्टाईल
  2. सखी
  3. फॅशन
Written By
Last Modified: शुक्रवार, 30 ऑक्टोबर 2020 (14:54 IST)

बारीक दिसायचे आहे मग कपड्यांमध्ये या रंगांचा वापर करा

कपड्यांची खरेदी करताना स्टाईल, वर्क, पॅटर्न असे विविध पैलू पडताळून पाहिले जातात. काही महिला पटकन खरेदी करतात तर काही महिलांना निवड करायला बराच वेळ लागतो. अर्थात कपड्यांच्या खरेदीत रंगांचीही महत्त्वाची भूमिका असते. म्हणूनच आपल्या व्यक्तिमत्त्वाला, बांध्याला साजेशा रंगांची निवड करणं आवश्यक आहे. ठरावीक रंगाच्या कपड्यांची निवड केल्यास स्थूल महिलाही बारीक दिसू शकतात. चलातर मग, अशाच काही रंगांविषयी जाणून घेऊ.
 
* काळ्या रंगाच्या कपड्यांमध्ये तुम्ही बारीक दिसू शकता. काळा हा गडद रंग आहे. गडद रंग व्यक्ती बारीक असल्याचा आभास निर्माण करतात. काळ्यासोबतच नेव्ही ब्लू, ब्राउन, चॉकलेटी, मरून, डार्क ग्रे असे रंगही तुम्ही निवडू शकता.
 
* मोनोक्रोमॅटिक शेड्‌सही तुम्हाला स्लीम लूक मिळवून देतील. मोनोक्रोमॅटिक लूकमध्ये शरीराचा स्थूलपणा लपतो. मोनोक्रॉमॅटिक लूक म्हणजे एकाच रंगाचे कपडे परिधान करणं.
 
* बारीक दिसण्यासाठी प्रत्येक वेळी एकाच रंगाचे कपडे घालणं गरजेचं नाही. तुम्ही लाईट आणि डार्क रंगांचं कॉम्बिनेशनही करू शकता. गडद रंगाच्या बॉटमवर ब्राईट टॉप घालता येईल. लाल आणि गुलाबी रंगाच्या छटा असणारे कपडेही खरेदी करता येतील. या रंगाचे ब्राईट कपडे तुम्हाला स्लिम लूक देतील. त्यामुळे स्थूल महिलांनी कपड्यांची खरेदी करताना रंगसंगतीकडे अधिक लक्ष द्यायला हवं.
 
वैष्णवी कुलकर्णी