गुरूवार, 9 जानेवारी 2025
  1. लाईफस्टाईल
  2. सखी
  3. सप्तरंग
Written By
Last Modified: शुक्रवार, 2 ऑक्टोबर 2020 (14:27 IST)

तिशीच्या आधी हे करा !

संसार आणि अन्य जबाबदार्‍यांच्या चक्रात आपण इतक्या गुरफटलेल्या असतो की लपरवापर्यंतनावाने हाक ऐकायची सवय असलेल्या आपल्याला मुलांचे मित्र किंवा मैत्रिणी काकू किंवा मावशी म्हणायला लागतात, दुकानदार ताईवरून आंटीवर येतात आणि रस्त्यावर गाडी चुकीची चालवली तर ‘काय बाई....' ने संभाषणाला सुरूवात होते आणि अचानक आपण एका वेगळ्या वयोगटात प्रवेश केल्याची जाणीव व्हायला लागते. आरसा आपल्याला हे सत्य सांगत असतोच पण ते ऐकायला मन तयार नसतं. अर्थात प्रत्येक वयाची एक नजाकत असते म्हणा, आणि वाढतं वय कुणालाच थांबवता येत नाही. मग त्याचं दुःख का करायचं? पण अशा अनेक गोष्टी आहेत ज्या त्या त्या वयात करायला हव्यात. तिशीच्या आतही काही गोष्टी करायला हव्यात. यात काही स्वतःसाठी तर काही इतरांसाठी असतात.

तिशीची पातळी करिअर आणि कुटुंब या दोघांनाही काही गोष्टी देण्यासाठी बांधील असते. आपल्या आवडत्या क्षेत्रात काम करायची सुरूवात करायची असेल तर तिशीच्या आत करणं कधीही चांगलं कारण त्यानंतर मिळणार्‍या संधी कमी होत जातात. त्यामुळे नोकरी करून काही आर्थिक ध्येयं गाठायची असतील तरी त्याची सुरूवातही तिशीच्या आतच करायला हवी. जसं की स्वतःचं घर घ्यायचं असेल तर त्याची किमान 25 ते 30 टक्के रक्कम आपण याच काळात साठवू शकतो. निवृत्तीनंतरचं प्लॅनिंग आता करायला सुरूवात केली तर त्याचे रिटर्न चांगले मिळू शकतात. या वयात बरंच काही करण्याची ऊर्मी असते. त्याला योग्य प्रकारे चॅनलाइज करण्याची शक्ती असते.

यावेळी मन आणि शरीर आपल्याला हवं तसं वळत असतं. त्यामुळे या दोघांना वळण लावण्याचं काम आधी करायला हवं. त्यासाठी चांगलं वाचन आणि नियमित व्यायामाची सवय शरीराला लावायला हवी. तिशीच्या आत वजन काबूत ठेवणं सोपं असतं. त्यामुळे त्याकडे लक्ष द्यायचं असेल तर आताच द्या. या वयात अजून फारशी भीती मनाला शिवलेली नसते. त्यामुळे जोखीम घेण्याची तयारी असते म्हणून गाडी शिकून स्वावलंबी व्हायचं असेल तर तेही याच वयात करायला हवं.

आपलं मित्रमंडळ वाढवणं किंवा आहे ते कायम ठेवणंही याच वयाची गरज असते. खरं तर पुढे येणार्‍या काळाची ही बेगमी म्हणा हवं तर म्हणून मैत्री टिकवण्याची आधुनिक साधनं शिकून घ्यायला हवीत. सोशल नेटवर्किंग आपला प्रांत नाही असं वाटत असेल तर थांबा ही उद्याची गरज होऊ शकते ! मनाला फ्रेश करायचं असेल तर एखादी नवी भाषा शिकायलाही हरकत नाही. अभ्यासाची सवय अजून पूर्णपणे मोडलेली नसते. आत्मविश्वास परतयायला अशा गोष्टींचा खूप उपयोग होतो. वैयक्तिक गोष्टीतही काही प्रयोग करायचं हेच खरं वय आहे. साडी मैत्रिणींनो, तिशीच्या आधी हे करा !

सवयीची होण्याआधी जीन्स ट्राय करायला काहीच हरकत नाही. नवा हेअरकट करून आपल्यातच झालेला बदल निरखायला काय हरकत आहे? मनातले विचार ब्लॉगवर मांडायला किंवा डायरीत उतरवायला सुरूवात तर करूया.
राधिका बिवलकर