शुक्रवार, 29 मार्च 2024
  1. धर्म
  2. सण-उत्सव
  3. नवरात्रौत्सव
Written By
Last Modified: मंगळवार, 29 सप्टेंबर 2020 (12:01 IST)

नवरात्री 2020 विशेष : आता गरब्यासाठी घरातच पार्लर सारखे तयार होऊ शकता

नवरात्र आल्यावर सर्वांचा उत्साह द्विगुणित होतो. नवरात्र म्हटले की गरबे होणारच. गरबे म्हटले की नटणं-सवरणं येतच. नवरात्री मध्ये शृंगाराचे आपलेच खास महत्त्व आहे. गरब्यामुळे याचे महत्त्व अजूनच वाढून जातं. पण यंदाच्या कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे सणासुदींना व्यवस्थितरीत्या आणि मोकळे पणाने साजरे करता येणं अशक्य झाले आहे. लोकं कोरोना काळात सामाजिक अंतर राखून वर्दळीच्या ठिकाणांपासून स्वतःचा बचाव करीत आहे. जेणे करून या संसर्गाचा पासून बचाव होवो. 
 
आपण या प्रसंगाला आपल्या घरात राहूनच विशेष बनवू शकता. जसे की आपल्याला माहीतच आहे की नवरात्रीमध्ये लोकं तयार होण्यासाठी पार्लरमध्ये जातात. पण सध्या कोरोना काळात हे शक्य नाही. नवरात्रीचे हे नऊ दिवस फार खास असतात. चला तर मग जाणून घेऊया अश्या काही टिप्स ज्यांचा अवलंब करून आपण घरातच पार्लर सारखे मेकअप करून गरब्यासाठी तयार होऊ शकता.  
 
* मेकअप लावण्याआधी चेहऱ्याला बर्फ लावा म्हणजे आपला चेहरा तजेल दिसेल आणि मेकअप दीर्घकाळ टिकून राहील.
 
* पार्लर सारखे मेकअप करण्यासाठी मेकअप करण्याच्या पूर्वी प्राइमर किंवा मॉइश्चरायझर लावावं.
 
* आपल्या चेहऱ्याच्या टोनशी जुळवून चेहऱ्यावर आणि मानेवर मेकअप बेस लावा.
 
* आपल्या मानेवर आणि चेहऱ्यावर हे चांगल्या प्रकारे लावा जेणे करून ठिपके किंवा पॅचेस दिसणार नाही. 
 
* डोळ्यांचा मेकअप करण्यासाठी आपल्या कपड्यांशी जुळणाऱ्या आयशॅडो वापरावं. आपण हिरवे, पीच, निळ्या रंगाचा वापर देखील करू शकता.
 
* आपल्या चेहऱ्याची वैशिष्ट्ये दाखवून देण्यासाठी आपल्याला कंटोरिंगचा वापर करायला हवा.
 
* लायनर आणि मस्करा लावायला विसरू नका.
 
* लिपस्टिक देखील गडद रंगाची वापर. लिपस्टिक लावण्यापूर्वी आपण आपल्या ओठांना लिप लायनरने आकार द्या, एक आउटलाइन काढा आणि मग लिपस्टिक लावा.
 
* आता पाळी येते केश सज्जेची, जर का आपण घरातच तयार होत आहात तर जास्त क्लिष्ट असणारी अशी केश सज्जा निवडू नका. एखादी सोपी केश सज्जा निवडा. आपण अंबाडा देखील बनवू शकता, कृत्रिम बन्स देखील वापरू शकता. पुढील केसांमध्ये पफ बनवा. बाजूने एक पातळ केसांची लट काढून त्यांना कर्ल करू शकता. या व्यतिरिक्त आपण आपल्या केसांमध्ये फुल किंवा इतर काही संसाधने वापरू शकता. या व्यतिरिक्त आपण आपल्या केसांना स्ट्रेट देखील ठेवू शकता किंवा आलटून पालटून एखाद्या दिवशी कर्ली केस देखील छान दिसतील. हाई किंवा लो बन देखील चांगले दिसू शकतात.