Chaitra Navratri 2020 : कठिन पाठ करणे शक्य नसल्यास नवरात्रीत 9 दिवस जपा 1 सोपं मंत्र
चैत्र नवरात्र म्हणजे आदिशक्तीची आराधना करण्याचे दिवस. या नवरात्रात दुर्गासप्तशती आणि श्रीमद भागवतात देवीच्या विविध रूपांची व्याख्या केली गेली आहे. नवरात्रीत हे 9 दिवस वाचावे आणि एक अक्षरीय सोपं अखंड मंत्राचा जाप करावा ..
शक्तीच्या उपासनेचा हा पर्व प्रतिपदेपासून नवमी पर्यंत साजरा होतो. या पर्वात देवीच्या 9 शक्तिरुपांची आराधना केली जाते. आदिशक्तीच्या 52 पीठात देवीची विशेष आराधना केली जाते.
देवी आराधनाच्या या पर्वात ज्यांना दुर्गा सप्तशतीचा पाठ करणे शक्य नसेल तर त्यांनी देवीच्या 9 रूपांच्या दिव्य एकाक्षरी मंत्राचा जाप करावा. हे मंत्र सर्व बाधा आणि अनिष्टतेचा नाश करतात. या मंत्राचा जाप केल्याने देवी सर्व मनोकामना पूर्ण करते.
या अखंड बीज मंत्रांचा जप करा.
* ॐ शैल पुत्र्यैय नमः
* ॐ ब्रह्मचारिण्यै नम:
* ॐ कुष्मांडैय नम:
* ॐ स्कंदमातैय नम:
* ॐ कात्यायनी नम:
* ॐ कालरात्रैय नम:
* ॐ महागौरेय नम:
* ॐ सिद्धिदात्रैय नम: