1. धर्म
  2. सण-उत्सव
  3. नवरात्रौत्सव
Written By

कोणत्या देवीची पूजा केल्याने मिळेल लाभ, जाणून घ्या राशीनुसार

शारदीय नवरात्री 2019 मध्ये राशी प्रमाणे देवीची निवड करून साधना केल्यास प्रत्येक क्षेत्रात निश्चितच यश हाती लागतं. राशीनुसार जाणून घ्या आपली देवी कोणती आहे-
 
(1) मेष राशी : या राशीच्या जातकांनी भगवती तारा, नील-सरस्वती किंवा शैलपुत्री देवी आराधना करावी.
 
(2) वृषभ राशी : या राशीच्या जातकांनी भगवती षोडशी-श्री विद्या देवीची साधना करावी किंवा देवी ब्रह्मचारिणीची आराधना देखील योग्य फल देईल.
 
(3) मिथुन राशी : या जातकांनी भुवनेश्वरी किंवा चन्द्रघंटा या देवीची उपासना केली पाहिजे.
 
(4) कर्क राशी : कर्क राशीच्या जातकांनी कमला देवी किंवा सिद्धिदात्री देवीची उपासना केली पाहिजे.
 
(5) सिंह राशी : यांनी पीताम्बरा देवी किंवा कालरात्री देवीची उपासना केली पाहिजे.
 
(6) कन्या राशी : कन्या राशीच्या जातकांनी भुवनेश्वरी देवी किंवा चन्द्रघंटा देवीची उपासना केली पाहिजे.
 
(7) तूळ राशी : यांनी श्री विद्यात माता षोडशी किंवा ब्रह्मचारिणी देवीची उपासना केली पाहिजे.
 
(8) वृश्चिक राशी : या राशीच्या जातकांनी भगवती तारा किंवा शैलपुत्री देवीची उपासना करावी.
 
(9) धनू राशी : या जातकांनी मंगला किंवा सिद्धिदात्री देवीची उपासना करावी.
 
(10) मकर राशी : या जातकांनी जयंती किंवा सिद्धिदात्री देवीची उपासना केली पाहिजे.
 
(11) कुंभ राशी : यांनी भद्रकाली किंवा सिद्धिदात्री देवीची उपासना केली पाहिजे.
 
(12) मीन राशी : यांनी कमला किंवा सिद्धिदात्री देवीची उपासना केली पाहिजे.