शनिवार, 28 डिसेंबर 2024
  1. धर्म
  2. सण-उत्सव
  3. दिवाळी 2024
Written By वेबदुनिया|

महालक्ष्मी पूजन विधी

diwali
मराठी भाषेत महालक्ष्मी पूजन विधी देत आहोत. ALSO READ: घरात लक्ष्मी पूजन कसे करावे? योग्य पद्धत Diwali Laxmi Puja in Marathi 
दर्श अमावस्या, महालक्ष्मी कुबेरपूजन 
आश्विन कृष्णपक्ष, शनिवार दि. ४ नोव्हेंबर २०२१ सायंकाळी ६.०९ मिनिटापासून ते रात्री ८ वाजून २० मिनिटापर्यंत शुभ मुहूर्त आहे.  
यावेळी महाकालीपूजन, महालक्ष्मी पूजन, महासरस्वती पूजन, कुबेर पूजन आणि गादीपूजन केले जाते. 
 
दिवाळी २०२१ - शुभ मुहूर्त (Diwali 2021 Shubh Muhuarat)
दिवाळी : ४ नोव्हेंबर, २०२१, गुरुवार
अमावस्या तिथि प्रारंभ: नोव्हेंबर ०४, २०२१ सकाळी ०६:०३ पासून.
अमावस्याची तिथी समाप्त: ०५ नोव्हेंबर २०२१ पर्यंत ०२:४४ पर्यंत.
 
लक्ष्मीपूजनासाठी शुभ वेळ (Lakshmi Puja 2021 Shubh Muhuarat)
सायंकाळी ६ वाजून ०९ मिनिटांपासून रात्री ८ वाजून २० मिनिटांपर्यंत
कालावधी: १ तास ५५ मिनिटे
प्रदोष काळ: १७:३४:०९ ते २०:१०:२७
वृषभ कालावधी: १८:१०:२९ ते २०:०६:२०
 

1. वेळ: या पद्धतीने महालक्ष्मी पूजन करण्यासाठी पंधरा मिनिटे वेळ लागतो. ज्या व्यक्तीकडे वेळ नाही किंवा मोठी पूजा करण्याची इच्छा नाही. तसेच त्याला संस्कृतचे ज्ञान नाही ती व्यक्ती हा विधी करू शकते.
2. विधी: आपण विकत घेतलेल्या नवीन प्रतिमेची, मूर्तीची पूजा करण्यासाठी विधी निर्देश व मंत्रांचा भावार्थ मराठीत प्रस्तुत केला जात आहे. ज्यामुळे संस्कृतच्या अडचणी दूर होऊ शकतील.
3. पूजन सामग्री: आवश्यक ती पूजन सामग्री पूजेपूर्वीच मांडून ठेवा.
4. मुहूर्त: मूहूर्त पंचांगात पहा.
5. वस्त्र: पूजा सूरू करण्यापूर्वी आंघोळ करून नवीन वस्त्र परिधान करा.
6. गंध: कपाळाला गंध लावून पूजा करा.
7. दिशा: दिवसा पूर्वेला तोंड करून किंवा संध्याकाळी उत्तरेला तोंड करून पूजा करा.
8. आसन: कुशाच्या किंवा लाल उशीच्या आसनावर बसून पूजा करा. फाटलेले किंवा कपड्याचे आसन किंवा दगडावर बसून पूजा करू नये.
9. पूजन सामग्री: पूजन सूरू करण्यापूर्वी पूजेचे सर्व साहित्य आपल्याजवळ आणून ठेवा. शुद्ध पाणी एखाद्या पवित्र भांड्यात घ्या.
10. वस्त्र : हात धुण्यासाठी स्वच्छ कपडा आपल्याजवळ ठेवा. परिधान केलेल्या वस्त्राने हात धुऊ नये.
11. मूर्ती स्थापना: पूजा सुरू करण्यापूर्वी श्री महालक्ष्मीची प्रतिमा एखाद्या लाकडाच्या पाटावर किंवा गहू, मूग, ज्वारीच्या धान्यावर लाल कपडा अंथरून स्थापित करा.

भाग - 2 पूजन प्रारंभ
पूजा करणार्‍या व्यक्तीने प्रत्येक क्रियेबरोबर मराठीत दिलेले दिशा-निर्देश वाचून त्याचे अनुसरण करावे. प्रत्येक क्रियेच्या माहितीसह कृतीचा उल्लेख दिलेला आहे. संपूर्ण विधी दोन-तीन वेळा वाचून महालक्ष्मी पूजनाचा आनंद घेऊ शकता.

दीपक पूजन:- तूपाने भरलेल्या पात्रात दिवा प्रज्वलित ठेवा. दिवा लावून हात धुवा. खाली अक्षता टाकून त्यावर दिवा ठेवा. हातात फुलांच्या पाकळ्या घेवून खालील मंत्र म्हणा.
'हे दीप देवी! मला नेहमी सुखी राहू दे. जोपर्यंत हे पूजन चालू आहे तोपर्यंत आपण शांत किंवा स्थिर प्रज्वलित होत रहा.' आणि पाकळ्या दिव्याच्या खालील बाजूस टाका.

परिक्रमा:  
हातात पाणी घेऊन खालील प्रत्येक मंत्राचा एकदा उच्चार करा. चौथा मंत्र म्हटल्यानंतर हात धुवा.
1. ओम केशवाय नम: स्वाहा.... (परिक्रमा करा)
2. ओम माधवाय नम: स्वाहा.... (परिक्रमा करा)
3. ओम गोविंदाय नम: स्वाहा.... (परिक्रमा करा)
4. ओम ऋषीकेशाय नम: हस्त-म् प्रक्षाल्-यामि। (हात धुवा)

पवित्रीकरण
पवित्रीकरण पूजेसाठी उजव्या हाताच्या अनामिकेजवळील सर्व बोटांनी खालील मंत्र बोला आणि स्वत: च्या अंगावर किंवा पूजा साहित्यावर पाणी शिंपडावे.
मंत्र: 'भगवान श्री पुंडरीकाक्षाचे नामोच्चारण केल्याने पवित्र किंवा अपव‍ित्र कोणत्याही अवस्थेत असणारा मनुष्य अंत:करण पवित्रता प्राप्त करू शकतो.'
'भगवान पुंडरीक्षा मला खालील पवित्रता प्रसन्न कर'

स्वस्ती पूजन  
विधी: शुभ कार्य आणि शांतीसाठी हा मंत्र म्हटला जातो.
मंत्र: 'हे त्रिलोका! मला शांतता लाभू दे. हे अंतरिक्षा! मला शांतता मिळू दे. हे पृथ्वी! मला शांतता लाभू दे. हे जल! मला शांतता लाभू दे. हे औषधीदेवी! मला शांती मिळू दे. हे विश्वदेवी! मला शांती मिळू दे. जी शांती परब्रम्हापासून सर्वांना मिळते ती मला मिळू दे.' हे सदा कार्यात मग्न असणार्‍या सूर्य कोटीप्रमाणे महातेजस्वी विशाल गणपती देवा माझे दु:ख निवारण कर. 'हे नारायणी! सर्व प्रकारची मंगलकामना करणारी त्रिनेत्रधारी मंगलदायिनी देवी! आपण सर्व पुरूषांना सिद्धी देणारी देवी आहात. मी आपल्या शरण येतो. माझा आपणास नमस्कार आहे. तिन्ही देवांचे स्वामी ब्रह्मा, विष्णू आणि महेशाने सुरू केलेल्या सर्व कार्यात आम्हाला सिद्धी मिळू दे.'

संकल्प
हातात पाणी घेऊन म्हणा :- दिवाळीच्या शुभ मुहूर्तावर श्री महालक्ष्मीची प्रसन्नतेने पूजा करतो.

आता श्री गणेश पूजन 
श्री गणेशाचे ध्यान

विधी: ध्यान म्हणून प्रणाम केला जातो.
ध्यान मंत्र: 'सृष्टीच्या प्रारंभकाळात प्रकट झालेले जे या जगाचे परमकारण आहे. गणेशाला चार भुजा आहेत, गजवदन असल्यामुळे त्यांचे दोन्ही कान सूपाच्या आकाराचे आहेत, त्यांना केवळ एकच दात आहे. ते लंबोदर असून त्यांचा रंग लाल आहे. त्यांना लाल रंगाचे वस्त्र, चंदन आणि फुले प्रिय आहेत. त्याच्या चार हातांपैकी एका हातात पाश, दुसर्‍या हातात अंकुश, तिसर्‍या हातात वरद मुद्रा आणि चौथ्या हातात अभय मुद्रेबरोबर मोदक धारण केलेले आहे. त्यांचे वाहन उंदीर आहे. जो व्यक्ती श्रीगणेशाची नित्य पूजा करतो त्याला योगीत्व प्राप्त होते.' हे गणराया! आपल्याला प्रणाम करतो.

आवाहन व प्रतिष्ठापना
विधी: हातात अक्षता घेऊन खाल‍ील मं‍त्र म्हणून अक्षता (तांदूळ) अर्पण केल्या जातात.
मं‍त्र: ॐ महालक्ष्‍मी देवी! सिद्धी बुद्धीसहीत प्रतिष्ठीत हो.

स्नान: 
विधी: प्रथमत: पाण्याने, नंतर पंचामृत आणि पुन्हा शुद्ध पाण्याने स्नान केले जाते. याला स्नानीय समर्पण, पंचामृत समर्पण, शुद्धोदक स्नान असे म्हणतात.
विशेष: महालक्ष्मीची मूर्ती मातीची असल्यास एका पूजेच्या सूपारीवर गणेशाची भावना व्यक्त करून स्नान केले जाते. मूर्तीवर थोडे पाणी शिंपडले जाते. सुपारीला ताम्हनात ठेवून खालील क्रिया करा.
मंत्र-स्नानीय समर्पण (शुद्ध पाण्याने स्नान): 'हे देवी! गंगाजल जे सर्व पापांचा नाश करणारे आणि शुभ आहे. त्याने आपल्याला आंघोळ घालत आहे. आपण त्याचा स्वीकार करा'.



devi
  WD
पंचामृत स्नान:
'हे देवी! दूध, दही, तूप, मध आणि साखरयुक्त पंचामृताने आपल्याला स्नान घालत आहे. आपण त्याचा स्वीकार करावा.'
शुद्धोदक स्नान (पुन्हा शुद्ध पाण्याने स्नान):
'हे देवी! या शुद्ध पाण्याच्या रूपात गंगा, यमुना, सरस्वती, नर्मदा, सिंधू, कावेरी आणि गोदावरी उपस्थित आहेत. आपण स्नानासाठी हे जलग्रहण करा.'

वस्त्र किंवा उपवस्त्र: 
विधी: वस्त्र किंवा उपवस्त्र असे दोन वस्त्र अर्पित केले जातात.
उपवस्त्र समर्पण: 'हे महालक्ष्मी! विविध प्रकारचे चित्र, सुशोभित वस्त्र आपल्याला समर्पित आहे. आपण याचा स्वीकार करा किंवा मला यशस्वी होऊ दे'.

गंध, फुले किंवा फुलमाळा
विधी: महालक्ष्मीला गणपतीला रक्त चंदनही अर्पित केले जाते.

सुगंधित धूप
विधी: पूजेमध्ये मनमोहक सुगंधी अगरबत्ती लावली पाहिजे. अगरबत्ती लावून धूप पसरवा.
मंत्र: उत्तम गंधयुक्त वनस्पतिच्या रसापासून तयार धूप, जी सर्व देवतांना सुवास घेण्यास योग्य आहे. 'हे महालक्ष्मी! हे आपल्या सेवशी समर्पित आहे. आपण याचा स्वीकार करा.

ज्योती दर्शन
विधी : या विधीसाठी एक दिवा लावून हात धुवा.
मंत्र: 'हे महालक्ष्मी! कापसाच्या वातीने प्रज्वलित दीपक आपल्या सेवेसाठी अर्पण करत आहे. तो त्रैलोक्याचा अंधकार दूर करणारा आहे. हे दीप ज्योतिर्मय देवी! माझ्या परमात्मा! मी आपणास हा दीपक अर्पण करत आहे. हे देवी! आपण मला नरक यातनांपासून वाचवा. माझ्याकडून झालेल्या पापांची मला क्षमा करा.'

नैवेद्य निवेदन 
विधी: विविध प्रकारचे मोदक, मिठाई, फळे त्यामध्ये केळी, सफरचंद, चिकू इत्यादी अर्पण करावे.
मंत्र: 'हे देवी! दही, दूध, तूपापासून तयार केलेले खाद्यपदार्थ नैवद्याच्या रूपात अर्पण करतो. आपण त्याचा स्वीकार करा.' 'हे देवी! आपण हे नैवद्य ग्रहण करा आणि आपल्या प्रती माझ्या मनात असलेल्या भक्तीस सार्थक करा. मला परलोकात शांती मिळू दे.'

दक्षिणा किंवा नारळ (श्रीफळ)
विधी: एक श्रीफळ ‍किंवा दक्षिणा देवीला दान केली जाते. (खालील वाक्य म्हणून दक्षिणा व श्रीफळ अर्पण करा)

आरती  
विधी: कापराच्या एक किंवा तीन वड्या प्रज्वलित ठेवून आरती केली जाते.
ॐ महालक्ष्मी चरणी नमस्कार करा. कापूर निरंजन आपल्याला समर्पित आहे. (हात जोडून प्रणाम करा आरती घेतल्यानंतर अवश्य हात धुवा)

पुष्पांजली
विधी: हातात फुले अथवा फुलांच्या पाकळ्या घ्या. खालील मंत्र बोलून फुले देवीच्या चरणी समर्पित करा.
(खालील वाक्य बोलून पुष्पांजली अर्पित करा)
ॐ महालक्ष्मीला नमस्कार करून मंत्र पुष्पांजली अर्पण करतो.

प्रदक्षिणा 
(खालील मंत्र बोलल्यानंतर एक परिक्रमा पूर्ण करा)
मंत्र: मनुष्याने केलेली सर्व पापे परिक्रमा करतेवेळी पावला-पावलावर नष्ट होऊन जातात. ॐ महालक्ष्मीला नमस्कार करून प्रदक्षिणा अर्पित करतो.

प्रार्थना व क्षमाप्रार्थना 
प्रार्थना: 'हे महालक्ष्मी! तू विघ्नांवर विजय मिळविणारी आणि ज्ञान संपन्न आहेस. आपल्या चरणी माझा नमस्कार, नमस्कार अनेक वेळा नमस्कार.
'हे देवी! आपण नेहमी माझ्या कार्यात येणार्‍या विघ्नांचा सर्वनाश करा.'

क्षमा प्रार्थना-
पूजा, विधी करताना माहितीच्या अभावाने काही चुका होऊ शकतात. त्यासाठी क्षमा प्रार्थना केली जाते.
यासाठी हात जोडून खालील मंत्र म्हणा.
मंत्र: 'हे देवी! मला मंत्र आणि भक्ती येत नाही. मला स्तुतीही करता येत नाही. स्वभावाने मी आळशी
असल्यामुळे विविध पूजन साहित्याने तुझी विधीवत पूजा करू शकलो नाही.'
'हे देवी! मी अज्ञानाने जी पूजा केली आहे, कृपा करून ती मान्य करून घे. माझ्याकडून झालेल्या चुकांबद्दल
मला क्षमा कर. मी या केलेल्या पूजेमुळे आपण माझ्यावर प्रसन्न रहाल अशी अपेक्षा करतो.

प्रणाम किंवा पूजा समर्पण
विधी: पूजेच्या शेवटी साष्टांग प्रणाम केला पाहिजे किंवा पूजा कर्म ईश्वराला समर्पित करणे आवश्यक आहे. (प्रथम साष्टांग प्रणाम करा, त्यानंतर हातात पाणी घेवून खालील मंत्र बोला व पाणी पात्रात सोडून द्या)
मंत्र: या पूजेमुळे सिद्धी बुद्धीसहीत महालक्ष्मी संतुष्ट होऊ दे. या पूजेवर माझा नाही तिचाच अधिकार आहे.

 दीपक पूजन: 
दिवा पात्रात तूप टाकून कापसाची वात लावा. दिवा उजळून झाल्यावर हात धुवा. नंतर दिवा तांदुळ किंवा फुलाच्या अंथरूणावर मूर्तीच्या उजव्या बाजूला ठेवून द्या. (नंतर हातात फुलाच्या पाकळ्या घेवून खालील मंत्र म्हणा)
मंत्र: 'हे दीप देवी! आपण मला नेहमी मंगल आणि प्रसन्न ठेवा. पूजा चालू असेपर्यंत आपण शांत व स्थिर प्रज्वलित होत रहावे.'

(हातातील पाकळ्या दिव्याजवळ ठेवा)