शुक्रवार, 27 डिसेंबर 2024
  1. लाईफस्टाईल
  2. सखी
  3. सौंदर्य सल्ला
Written By
Last Updated : बुधवार, 10 ऑगस्ट 2022 (14:02 IST)

Basic Makeup Tips बेसिक मेकअप टिप्स, पार्लर जाण्याची गरजच भासणार नाही

मेकअप करणं कोणाला आवडत नाही. क्वचितच असं कोणी असेल ज्याला मेकअप करणं आवडत नसेल. मेकअप करताना काही मूलभूत गोष्टी लक्षात घेतल्या नाहीत तर मेकअप आपल्या चांगल्या सौंदर्याला खराब देखील करू शकतं. यामुळे आपला चेहरा देखील निस्तेज दिसू शकतो. अशात मेकअप करण्यापूर्वी आपल्या त्वचेला जाणून घेणं महत्त्वाचे आहेत. 
 
तेलकट, कोरडी किंवा सामान्य त्वचा. तिन्ही प्रकारच्या त्वचेवर मेकअप करताना काही गोष्टींकडे लक्ष देणे खूप महत्त्वाचे आहेत. अश्याच काही टिप्स बद्दल आम्ही आपल्याला सांगत आहोत ज्या मेकअप करताना आपली मदत करतील.
 
* कोरड्या त्वचेसाठी मेकअप -
ज्यांची त्वचा नेहमी उन्हाळ्यात आणि पावसाळ्यात कोरडी असते, त्यांची त्वचा हिवाळ्यात कोरडी पडणे तर स्वाभाविकच आहे. त्यासाठी आपण मेकअपच्यापूर्वी आपल्या त्वचेला नैसर्गिकरीत्या निरोगी बनविण्यासाठी एक पॅक बनवा यासाठी एक चमचा मुलतानी चिकणमाती मध्ये साय आणि स्ट्राबेरी मिसळून आपल्या चेहऱ्यावर लावा आणि काही वेळानंतर चेहरा धुऊन घ्या. आपल्या त्वचेच्या रंगाशी साजेशी क्रिमी बेस लावा. पण लक्षात असू द्या की याला सेट करण्यासाठी पावडरचा हलका थर लावणं महत्त्वाचे आहे. यामुळे बेस जास्त काळ टिकून राहत. गालावर गुलाबी किंवा पीच शेडचे क्रिमी ब्लशर लावावं. याला चांगल्या प्रकारे मिसळायला ब्रशच्या ऐवजी स्पॉंज वापरा. डोळ्यांवर हलके रंगीत क्रिमी असे आयशॅडो वापरावे आणि त्यावर पावडर बेस असलेले आयशॅडो लावून सेट करावं. व्हिटॅमिन ई ने समृद्ध असलेली लिपस्टिक सध्याच्या काळासाठी सर्वोत्तम आहे.
 
* सामान्य त्वचेसाठी मेकअप - 
त्वचेचा कोरडेपणा दूर करण्यासाठी 1 चमचा कॅलॅमाईन पावडर मध्ये अर्ध पिकलेलं केळ, 1 चमचा बदाम रोगन, अर्धा चमचा मध आणि 2 चमचे दूध घालून पेस्ट बनवून आपल्या चेहऱ्यावर लावा. काही वेळा नंतर चेहऱ्याला कोमट पाण्याने धुऊन घ्या. आपल्या त्वचेला थंड वाऱ्या पासून वाचण्यासाठी टिंटेड मॉइश्चरायझर लावा. यामुळे आपली त्वचा मऊ आणि तजेल होते. गालांवर क्रिमी ब्लशचा वापर करा. असे केल्यास मॉइश्चरायझर टिकून राहत. डोळ्यांचे मेकअप सुरू करण्यापूर्वी क्रिमी लुक साठी आई -प्राइमर लावा. ओठांना हायड्रेट करणं आवश्यक आहे. त्यावर चांगल्या क्वालिटीचे लीप बाम लावा. मग क्रिमी लिपस्टिक लावा. 
 
* तेलकट त्वचेसाठी मेकअप - 
तेलकट त्वचा असणाऱ्यांना मेकअप ने तयार करणं गरजेचं असत. अश्या त्वचेला फ्लॉलेस लुक देण्यासाठी चेहऱ्यावर बी-बी क्रीम लावावी. बी-बी क्रीम फाउंडेशन आणि मॉईश्चराइझरचे परिपूर्ण मिश्रण असतं, म्हणून ह्याला लावल्यावर त्वचा एकसारखी आणि मॉइश्चराइझ होते. गालांवर मुजबेस्ड ब्लाऑन लावा, कारण हे लावताक्षणी पावडर स्वरूपात बदलेल आणि चेहऱ्यावर देखील चिकटपणा येत नाही. ब्राईट शेड्स डोळ्यांना आकर्षित करतात. म्हणून गडद शेड्स असलेले पावडरबेस आयशॅडो आपल्यासाठी उपयुक्त ठरतील.