रविवार, 26 जानेवारी 2025
  1. मनोरंजन
  2. मराठी सिनेमा
  3. नाट्य-चित्र गप्पा
Written By
Last Modified: मंगळवार, 10 नोव्हेंबर 2020 (16:18 IST)

जागतिक मराठी नाट्यकर्मी संघ राज भेटीला

जागतिक मराठी नाट्यकर्मी संघाने आज मनसे अध्यक्ष राज ठाकरेंची भेट घेतली. यावेळी नाटक कलाकार, निर्माते आणि दिग्दर्शक यांनी नाटक सुरु करण्यासंदर्भात येणाऱ्या अडचणी राज ठाकरेंसमोर मांडल्या. या शिष्टमंडळात प्रशांत दामले, अभिनेत्री वंदना गुप्ते, महेश मांजरेकर, वामन केंद्रे, पंढरीनाथ कांबळे, अजित भुरे, अतुल परचुरे या सगळ्यांची उपस्थिती होती. 
 
काही दिवसांपूर्वीच ठाकरे सरकारने नाट्यगृहं, सिनेमागृहं आणि मल्टिप्लेक्स उघडण्यास संमती दिली आहे. मिशन बिगिन अगेन अंतर्गत हा निर्णय घेण्यात आला आहे. कंटेन्मेंट झोनच्या बाहेरची नाट्यगृहं, सिनेमागृहं आणि मल्टिप्लेक्स उघडण्यास संमती देण्यात आली आहे. नाट्यगृह, सिनेमागृहं यांच्या एकूण आसन क्षमनतेच्या ५० टक्के आसनक्षमतेने प्रेक्षकांना उपस्थित राहता येणार आहे. आता हळूहळू नाट्यगृहं सुरु होत असली तरीही अडचणी संपलेल्या नाहीत. आपल्या याच अडचणी मराठी कलाकारांनी मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांच्यापुढे मांडल्या.