मंगळवार, 24 डिसेंबर 2024
  1. मनोरंजन
  2. मराठी सिनेमा
  3. नाट्य-चित्र गप्पा
Written By
Last Modified: सोमवार, 19 ऑक्टोबर 2020 (14:28 IST)

प्राजक्ता आर्याच्या भूमिकेत

आई माझी काळूबाई या मालिकेत प्राजक्ता गायकवाड ही आर्याच्या भूमिकेत दिसत आहे. सोनी मराठी वाहिनीवर सुरू झालेल्या आई माझी काळूबाई मालिकेच्या प्रामोला आणि प्राजक्ता गायकवाडच्या या नव्या भूमिकेला प्रेक्षकांनी विशेष पसंती दिली आहे.
 
या मालिकेत प्राजक्ता ही आर्या कॉलेज तरुणीची भूमिका साकारत आहे. मी पहिल्यांदाच माझ्या वयानुरूप भूमिका करणार आहे आणि या भूमिकेसाठी मी खूप उत्सुक आहे, असे ती म्हणाली. ही भूमिका वेगळ्या धाटणीची आहे. गेल्याच वर्षी मांढरदेवी काळूबाईच्या दर्शनाचा योग प्राजक्ताला आला होता आणि या वर्षी ही भूमिका मिळाली, त्यामुळे हा काळूबाईचा आशीर्वादच आहे; असे प्राजक्ता समजते.
 
या भूमिकेसाठी प्राजक्ताने स्वतःवर बरेच काम केले असून तिने स्वतःमध्ये आमूलाग्र बदल केले आहेत. याआधी ऐतिहासिक भूमिकेतून प्रेक्षकांसमोर आलेली प्राजक्ता पहिल्यांदाच अशा वेगळ्या ‍भूमिकेत दिसत आहे. या मालिकेत काळूबाईची भूमिका अलका कुबल साकारत आहेत. काही दिवसापूर्वी अलका या कोरोना पॉझिटिव्ह निघाल्या होत्या. मात्र आता त्या तंदुरुस्त झाल्या आहेत. सध्या या मालिकेला चांगला प्रतिसाद मिळत आहे.