रविवार, 26 जानेवारी 2025
  1. मनोरंजन
  2. मराठी सिनेमा
  3. नाट्य-चित्र गप्पा
Written By
Last Modified: बुधवार, 30 सप्टेंबर 2020 (14:23 IST)

काय सांगता, सुबोध भावे चक्क ऑनलाईन लग्न लावत आहे

लग्नाच्या गाठी स्वर्गात बांधल्या जातात आणि येथे केवळ त्यांची जुळवणी केली जाते असे आपणही ऐकलेचं असेल. लग्नसोहळा म्हटलं तर त्यात सगळं काही येतं. वर वधू संशोधनापासून तर मुलगी सासरी जाई पर्यंत सगळं काही असतं. अश्याच काही आंनदाच्या लग्न सोहळ्याला अनुभवयाला मिळणार आहे. आणि हा लग्न सोहळा चक्क ऑनलाईन असणार आहे. 
 
होय, ऑनलाईन. आपले सर्वांचे लाडके असे सुबोध भावे ज्यांनी 'पुष्पक विमान' सारखा दर्जेदार चित्रपट निर्मित केला होता. आणि बऱ्याचश्या चित्रपटात आणि मालिकांमध्ये काम केले आहे. ते प्रथमच मालिकेचे निर्मिते म्हणून रसिक प्रेक्षकांसाठी घेऊन आले आहे 'शुभमंगल ऑनलाईन'. 
 
सुबोध भावे यांची कान्हाज मॅजिक निर्मित आणि दिग्दर्शक वैभव चिंचाळकर यांची 'शुभ मंगल ऑनलाईन ' ही मालिका प्रेक्षकांच्या भेटी साठी 28 सप्टेंबर पासून दर रोज सोमवार ते शनिवारी टीव्हीच्या कलर्स या मराठी चॅनल वर रात्री 
9:30 वाजता प्रेक्षकांसाठी प्रक्षेपित होत आहे. सुकन्या कुलकर्णी मोने, अमिता खोपकर, सायली संजीव, सुयश टिळक, आनंद इंगळे, मिलिंद फाटक, अंकिता पनवेलकर या दिग्गज कलावंतांसह ही मालिका सुरु झाली आहे.
 
या मालिकेविषयी बोलताना भावे म्हणाले, मालिका बनवायची फार इच्छा असून चांगली कथा मिळत नव्हती, लॉकडाऊन काळात ही गोष्ट सुचली, आणि त्यावर काम करावेसे वाटले . ते म्हणतात की या मालिकेत गोष्ट आहे ती शंतनू आणि शर्वरीची, त्यांची ऑनलाईन भेट घडते आणि त्या भेटीपासून ते लग्नाच्या प्रवासापर्यंतची ही गोष्ट आहे. 
 
शंतनू सदावर्ते हा एक महत्वाकांक्षी, देखणा, एयरलाईनमध्ये काम करणारा तरुण आहे ज्याचा लग्न करण्यासाठीचा नकार आहे. तर शर्वरी ही हुशार, मनमिळाऊ, मोकळी, बिनधास्त, स्वभावाने मस्त अशी मुलगी आहे. या दोघांच्या विरोधाभासी स्वभाव आहे जी गोष्टला गंमतीशीर बनवतं आणि त्यांचा ऑनलाईन गाठी-भेटी मुळे त्यांच्या बदलणाऱ्या आयुष्याची ही गोष्ट आहे. सुजय आणि सायली म्हणजेच शंतनू आणि शर्वरी ऑनलाईन भेटतात. त्यांचे लग्न व्हावे अशी त्यांचा पालकांची इच्छा असते. त्यांचा नात्यांना फुलवणारी ही गोष्ट आणि त्यांचं लग्न व्हावे या प्रयत्नात लागलेले त्यांचे पालक. अजून काय काय घडणार आहे, काय गंमती होणार आहे, हे प्रेक्षकांना बघायला नक्कीच आवडेल.