Free Hit Danka : 'फ्री हिट दणक्या'ने होणार सगळ्यांचीच 'दांडी गुल'

free hit danka
Last Modified सोमवार, 6 डिसेंबर 2021 (11:03 IST)
क्रिकेट हा जोश, उत्साहाचा खेळ असून भारतात त्याला वेगळेच स्थान आहे. याच खेळावर आधारित 'फ्री हिट दणका' या आगामी चित्रपटातील 'दांडी गुल' हे जोशपूर्ण गाणे सोशल मीडियावर प्रदर्शित झाले आहे. या चित्रपटातील 'रंग पिरतीचा बावरा' हे गाणे प्रदर्शित झाले असून प्रेक्षकांचा त्याला प्रचंड प्रतिसाद मिळत आहे. 'दांडी गुल' हे

गाणे 'फँड्री' फेम सोमनाथ अवघडे, अपूर्वा एस. तसेच 'सैराट' चित्रपटातील सुपरहिट जोडी अरबाज (सल्या) आणि तानाजी (लंगड्या) यांच्यावर चित्रित करण्यात आले आहे. या गाण्यात सोमनाथ आणि तानाजी अगदी सहज नृत्य करताना दिसत असले तरी त्यासाठी त्यांनी बरीच मेहनत घेतली आहे. सोमनाथ आणि तानाजी हे उत्तम अभिनेते आहेत परंतु नृत्यात ते तितकेसे निपुण नसल्याने नृत्यदिग्दर्शक सुजित कुमार यांनी या गाण्याच्या चित्रीकरणाअगोदर दोघांकडूनही १५ दिवस नृत्याची कार्यशाळा घेतली. या सरावादरम्यान अनेकदा दोघांचे पाय सुजले आहेत परंतु जिद्द न सोडता त्यांनी सराव पूर्ण केला. त्यांची ही मेहनत आपल्याला या गाण्यातून दिसते. नेहमी पेक्षा वेगळ्या धाटणीचे, गावरान बाज असलेले हे गाणे प्रत्येकाला थिरकायला लावणारे आहे. एसजीएम फिल्म्स प्रस्तुत 'फ्री हिट दणका' या चित्रपटात सुरेश विश्वकर्मा, अनिल नगरकर, गणेश देशमुख यांच्याही प्रमुख भूमिका आहेत. 'लय रुबाब दावू नका होईल दांडी गुल' असे या गाण्याचे बोल असून हे गाणे तरुणाईला थिरकायला लावणारे आहे. आनंद शिंदे यांचा दमदार आवाज लाभलेल्या या गाण्याला बबन अडागळे आणि अशोक कांबळे यांनी संगीत दिले आहे.

सुनील मगरे दिग्दर्शित 'फ्री हिट दणका' या चित्रपटाची
कथा आणि पटकथा सुनील मगरे यांची असून, लेखन आणि संवाद संजय नवगीरे यांचे आहेत. आकाश अलका बापू ठोंबरे, मेघनाथ गुरुनाथ सोरखडे आणि सुनिल मगरे चित्रपटाचे निर्माते आहेत तर नितीन बापू खरात, सुधाकर लोखंडे यांनी सहनिर्मात्यांची धुरा सांभाळली आहे. १७ डिसेंबर रोजी प्रदर्शित होणाऱ्या या चित्रपटातून क्रिकेटमधील संघर्ष, चुरस, उत्सुकता, डावपेच तसेच ग्रामीण भागातील रांगडेपणा, ग्रामीण भाषेतील लहेजा हे सर्व प्रेक्षकांना पाहायला मिळणार आहे.


यावर अधिक वाचा :

अयोध्या विशेष : राम जन्मस्थळ अयोध्यांचे 10 मुख्य प्रेक्षणीय ...

अयोध्या विशेष : राम जन्मस्थळ अयोध्यांचे 10 मुख्य प्रेक्षणीय स्थळ...
सप्तपुरींपैकी एक असलेली अयोध्या हिंदू, जैन, बौद्ध आणि शीख समुदायासाठी एक महत्त्वाचे ...

कुणकेश्वरचा इतिहास

कुणकेश्वरचा इतिहास
देवगडच्या दक्षिणेस 20 कि. मी. वर असलेले श्री क्षेत्र कुणकेश्वर निसर्गरम्य सौंदर्यस्थळ आणि ...

सफर निसर्गरम्य बूंदीची

सफर निसर्गरम्य बूंदीची
भटकंतीच्या दृष्टीने राजस्थानचं विशेष महत्त्व राहिलं आहे. राजस्थानमध्ये गेल्यावर जयपूर, ...

पलरुवी अर्थात दुधाचा धबधबा

पलरुवी अर्थात  दुधाचा धबधबा
केरळमधील सगळ्यात सुंदर धबधब्यांपैकी एक आहे, जो 300 फूट उंचावरून खाली येतो. दक्षिण ...

रामेश्वरम्: एक प्रसिद्ध तीर्थक्षेत्र

रामेश्वरम्: एक प्रसिद्ध तीर्थक्षेत्र
रामेश्वरम्, भारताच्या दक्षिण दिशेस बंगालच्या उपसागराच्या किनाऱ्यावर असणारे एक शहर. या ...

सोनाली बेंद्रेने व्यक्त केली व्यथा, कॅन्सरच्या ...

सोनाली बेंद्रेने व्यक्त केली व्यथा, कॅन्सरच्या शस्त्रक्रियेनंतर 24 तासांनंतरच डॉक्टरांना रुग्णालयातून घरी पाठवायचे होते, जाणून घ्या
बॉलिवूड अभिनेत्री सोनाली बेंद्रे तिच्या उत्कृष्ट अभिनयासाठी ओळखली जाते. मात्र काही ...

सुट्ट्या अविस्मरणीय बनवण्यासाठी, राणीखेतच्या या सुंदर ...

सुट्ट्या अविस्मरणीय बनवण्यासाठी, राणीखेतच्या या सुंदर ठिकाणी भेट द्या
उत्तराखंडमधील अल्मोडा जिल्ह्यातील कुमाऊं टेकड्यांच्या कुशीत वसलेले रानीखेत हे सदाहरित हिल ...

तारक मेहता फेम दया बेन दिशा वाकाणीने दिला मुलाला जन्म, ...

तारक मेहता फेम दया बेन दिशा वाकाणीने दिला मुलाला जन्म, अभिनेत्री दुसऱ्यांदा बनली आई
टेलिव्हिजनचा प्रसिद्ध रिअॅलिटी शो तारक मेहता का उल्टा चष्मा फेम दिशा वाकाणी पुन्हा एकदा ...

Justin Bieber Show : जस्टिन बीबरचा दिल्लीत होणार लाइव्ह ...

Justin Bieber Show : जस्टिन बीबरचा दिल्लीत होणार लाइव्ह कॉन्सर्ट
जर तुम्ही पॉप संगीताचे चाहते असाल तर तुमच्यासाठी एक आनंदाची बातमी आहे. पॉप स्टार गायक ...

Karan Johar Birthday: करण जोहरच्या वाढदिवसाच्या पार्टीत हे ...

Karan Johar Birthday:  करण जोहरच्या वाढदिवसाच्या पार्टीत हे सेलेब्स पोहोचले
बॉलिवूडचा सुप्रसिद्ध निर्माता-दिग्दर्शक करण जोहर आज त्याचा 50 वा वाढदिवस साजरा करत आहे. ...