Planet Marathi : 'प्लॅनेट मराठी'ने रोवला मराठी मनोरंजनाचा झेंडा अटकेपार

planate marathi logo
Last Modified बुधवार, 24 नोव्हेंबर 2021 (20:20 IST)
मराठीतील पहिलेवहिले ओटीटी प्लॅटफॉर्म ठरलेल्या 'प्लॅनेट मराठी'ने आपला झेंडा अटकेपार रोवला असून याचे निमित्तही तितकेच खास आहे. १९ नोव्हेंबर ते २७ नोव्हेंबर दरम्यान दुबईमध्ये महाराष्ट्र शासनाच्या सांस्कृतिक विभागाच्या वतीने 'एक्स्पो२०२० दुबई युएई' हा सोहळा आयोजित करण्यात आला आहे. या सोहळ्यात २० नोव्हेंबर रोजी इंडियन पव्हेलियनमध्ये 'प्लॅनेट मराठी'च्या 'सहेला रे' या वेबफिल्मचा टीझर लॉन्च करण्यात आला तर ‘गोष्ट एका पैठणीची' या चित्रपटाचा प्रिमिअरही दाखवण्यात आला. या सोहळ्याला महाराष्ट्र शासनाचे
सांस्कृतिक विभागमंत्री श्री. अमित देशमुख आणि सचिव आय.ए.एस श्री. सौरभ विजय तसेच महाराष्ट्र शासनाच्या चित्रपट-नाटक व सांस्कृतिक विकास विभागाचे व्यवस्थापकीय संचालक आय.ए.एस श्री. कैलाश पगारे आणि संयुक्त व्यवस्थापकीय संचालक आय.ए.एस श्री. कुमार खैरे उपस्थित होते.

यावेळी अमित देशमुख यांनी प्लॅनेट मराठी ओटीटीवरील कन्टेन्टची प्रशंसा करत पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या तसेच मनोरंजन क्षेत्रात विविध संधी उपलब्ध करून देण्याचे आश्वासनही दिले.
‘विस्टास मीडिया कॅपिटल कंपनी’चे सहकार्य असलेल्या 'प्लॅनेट मराठी' चा जगभरात असलेल्या सर्व मराठी प्रक्षकांपर्यंत दर्जेदार आशय असलेले मनोरंजनात्मक कार्यक्रम पोहोचवण्याचा मानस आहे. याच कामगिरीमुळे प्लॅनेट मराठीला दुबईमध्ये आयोजित करण्यात आलेल्या ‘ॲचिवर्स अवॅार्ड’ मध्ये ‘प्रॅामिसिंग रिजनल ओटीटी अवॅार्ड’ने सन्मानित करण्यात आले.

'एक्स्पो२०२० दुबई युएई'तील सहभागाबद्दल 'प्लॅनेट मराठी ओटीटी'चे सर्वेसर्वा अक्षय बर्दापूरकर म्हणतात, ''प्रेक्षकांना सर्वोत्कृष्ट कन्टेन्ट देण्यासाठी 'प्लॅनेट मराठी' नेहमीच प्रयत्नशील असते. समृद्ध आणि वैभवशाली मराठी भाषेला सातासमुद्रापार पोहोचवण्याच्या दिशेने टाकलेले हे एक पाऊल आहे.
'एक्स्पो२०२० दुबई युएई' सारख्या आंतरराष्ट्रीय स्तरावरील सोहळ्यात 'प्लॅनेट मराठी'ची निर्मिती असलेल्या 'गोष्ट एका पैठणीची' या चित्रपटाचा प्रिमिअर आणि 'सहेला रे' या वेबफिल्मचे टीझर लॉन्च होणे ही आमच्यासाठी अभिमानाची गोष्ट आहे. 'प्लॅनेट मराठी ओटीटी' प्लॅटफॉर्मवर प्रदर्शित होणाऱ्या प्रत्येक चित्रपटाचा तसेच वेबसिरीजचा आशय, मांडणी खूप वेगळी असते. येथे लहानांपासून मोठ्यांपर्यंत सर्वांसाठी मनोरंजनाचा खजिना उपलब्ध आहे. मराठी प्रेक्षकांचे भरभरून मनोरंजन करण्यासाठी आणि मराठी भाषा सातासमुद्रापार पोहोचवण्यासाठी 'प्लॅनेट मराठी ओटीटी' कायमच कटिबद्ध आहे.''


यावर अधिक वाचा :

अयोध्या विशेष : राम जन्मस्थळ अयोध्यांचे 10 मुख्य प्रेक्षणीय ...

अयोध्या विशेष : राम जन्मस्थळ अयोध्यांचे 10 मुख्य प्रेक्षणीय स्थळ...
सप्तपुरींपैकी एक असलेली अयोध्या हिंदू, जैन, बौद्ध आणि शीख समुदायासाठी एक महत्त्वाचे ...

कुणकेश्वरचा इतिहास

कुणकेश्वरचा इतिहास
देवगडच्या दक्षिणेस 20 कि. मी. वर असलेले श्री क्षेत्र कुणकेश्वर निसर्गरम्य सौंदर्यस्थळ आणि ...

सफर निसर्गरम्य बूंदीची

सफर निसर्गरम्य बूंदीची
भटकंतीच्या दृष्टीने राजस्थानचं विशेष महत्त्व राहिलं आहे. राजस्थानमध्ये गेल्यावर जयपूर, ...

पलरुवी अर्थात दुधाचा धबधबा

पलरुवी अर्थात  दुधाचा धबधबा
केरळमधील सगळ्यात सुंदर धबधब्यांपैकी एक आहे, जो 300 फूट उंचावरून खाली येतो. दक्षिण ...

रामेश्वरम्: एक प्रसिद्ध तीर्थक्षेत्र

रामेश्वरम्: एक प्रसिद्ध तीर्थक्षेत्र
रामेश्वरम्, भारताच्या दक्षिण दिशेस बंगालच्या उपसागराच्या किनाऱ्यावर असणारे एक शहर. या ...

गायिका शाल्मली खोलगडेने बॉयफ्रेंड फरहान शेखशी केलं लग्न, ...

गायिका शाल्मली खोलगडेने बॉयफ्रेंड फरहान शेखशी केलं लग्न, घरी साधेपणाने पार पडला सोहळा
मनोरंजन जगात लग्नाचा हंगाम सुरू आहे. काही दिवसांपूर्वीच राजकुमार राव आणि पत्रलेखा हे ...

शिमल्याला जाण्याची योजना आखत आहात? अविस्मरणीय सहलीसाठी या ...

शिमल्याला जाण्याची योजना आखत आहात? अविस्मरणीय सहलीसाठी या गोष्टी लक्षात ठेवा
हिवाळ्याच्या सुट्ट्या आल्या की, अनेकांना थंड भागात जायला आवडते. थंड ठिकाणांचा विचार केला ...

सलमान खान चित्रपटाच्या प्रमोशनसाठी अहमदाबाद मध्ये , गांधी ...

सलमान खान चित्रपटाच्या प्रमोशनसाठी अहमदाबाद मध्ये , गांधी आश्रमात जाऊन चरखा चालवला
बॉलीवूड अभिनेता सलमान खानचा ''अंतिम: द फाइनल ट्रूथ' हा चित्रपट चित्रपटगृहांमध्ये ...

रणवीरसिंग अभिनित '83' चित्रपटाचा ट्रेलर रिलीझ, रणवीर ...

रणवीरसिंग अभिनित  '83' चित्रपटाचा ट्रेलर रिलीझ, रणवीर सिंगला पाहून लोक थक्क झाले
रणवीर सिंग आणि दीपिका पदुकोण यांच्या '83' चित्रपटाचा ट्रेलर रिलीझ झाला आहे. ते ...

मराठी जोक : देवाने पाय का दिले ?

मराठी जोक : देवाने पाय का दिले ?
बंड्या: बाबा, मला गाडी घेऊन द्या. वडील : देवानं दोन पाय कशाला दिलेत..!