मंगळवार, 17 सप्टेंबर 2024
  1. मनोरंजन
  2. मराठी सिनेमा
  3. नाट्य-चित्र गप्पा
Written By
Last Modified: बुधवार, 14 ऑगस्ट 2024 (15:23 IST)

गान कोकिळा लता मंगेशकर पुरस्कार 2024 ज्येष्ठ गायिका अनुराधा पौडवाल यांना जाहीर

सांस्कृतिक कार्य विभागामार्फत दिले जाणार पुरस्कार जाहीर करण्यात आले असून गान सम्राज्ञी लता मंगेशकर पुरस्कार 2024 ज्येष्ठ गायिका अनुराधा पौडवाल यांना जाहीर करण्यात आला आहे. नटवर्य प्रभाकर पणशीकर रंगभूमी जीवन गौरव पुरस्कार, भारतरत्न पंडित भीमसेन जोशी शास्त्रीय संगीत जीवन गौरव पुरस्कार, संगीताचार्य अण्णासाहेब किर्लोस्कर संगीत रंगभूमी जीवन गौरव पुरस्कार,तमाशा सम्राज्ञी विठाबाई नारायणगांवकर जीवनगौरव पुरस्कार, ज्ञानोबा तुकाराम पुरस्कार,व बारा राज्य सांस्कृतिक पुरस्कारांचीही घोषणा सांस्कृतिक कार्यमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी केली आहे.
 
संगीत व गायन क्षेत्रात आपलं अमूल्य योगदान देण्यासाठी प्रसिद्ध ज्येष्ठ गायिका अनुराधा पौडवाल यांना या वर्षीचा लता मंगेशकर पुरस्कार जाहीर करण्यात आला.नटवर्य प्रभाकर पणशीकर रंगभूमी जीवन गौरव पुरस्कार प्रकाश बुद्धिसागर यांना संगीताचार्य अण्णासाहेब किर्लोस्कर संगीत रंगभूमी जीवन गौरव पुरस्कार शुभदा दादरकर यांना, ज्ञानोबा तुकाराम पुरस्कार संजयजी महाराज पाचपोर यांना,तमाशा सम्राज्ञी विठाबाई नारायणगांवकर जीवनगौरव पुरस्कार शशिकला झुंबर शुक्रे यांना,भारतरत्न पंडित भीमसेन जोशी शास्त्रीय संगीत जीवन गौरव पुरस्कार आरती अंकलीकर टिकेकरांना जाहीर करण्यात आला आहे. 2024 साठीचा पुरस्कार जनार्दन वायदंडे यांना जाहीर झाला आहे. तमाशा क्षेत्रात प्रदीर्घ सेवा केलेल्या ज्येष्ठ मान्यवर कलाकारास या पुरस्काराने गौरविण्यात येते.
 महाराष्ट्र लोककला क्षेत्राचा पुरस्कार अभिमन्यू धर्माजी सावदेकर, नृत्य वर्गवारीत श्रीमती सोनिया परचुरे, चित्रपट क्षेत्रासाठीचा पुरस्कार श्रीमती रोहिणी हट्टंगडी यांना घोषित झाला आहे. तसेच कीर्तन प्रबोधन क्षेत्रातील पुरस्कार संजयनाना धोंडगे, वाद्यसंगीत क्षेत्रातील पांडुरंग मुखडे, कलादान या प्रकारात नागेश सुर्वे (ऋषीराज), तमाशा वर्गवारीतील राज्य सांस्कृतिक पुरस्कार कैलास मारुती सावंत, तर आदिवासी गिरीजन वर्गवारी मध्ये शिवराम शंकर धुटे यांना,शाहिरी क्षेत्रातील पुरस्कार शाहिर राजेंद्र कांबळे,यांना जाहीर केला आहे. 

या वर्षीपासून जीवनगौरव पुरस्कारांच्या रकमेत वाढ करण्यात आली असून आता 10 लाख रुपये रोख, सन्मानचिन्ह व मानपत्र असे देण्यात येणार.तर राज्य सांस्कृतिक पुरस्काराच्या रकमेत देखील वाढ करण्यात आली असून पुरस्काराचे स्वरूप रुपये तीन लक्ष रोख, मानपत्र व मानचिन्ह असे आहे. हे सर्व पुरस्कार लवकरच देण्यात येतील अशी माहिती सुधीर मुनगंटीवार यांनी दिली आहे. 
Edited by - Priya Dixit