शनिवार, 4 जानेवारी 2025
  1. मनोरंजन
  2. मराठी सिनेमा
  3. नाट्य-चित्र गप्पा
Written By

संस्कृती कला दर्पण गौरव पुरस्कार जाहीर

मराठी रंगभूमी आणि चित्रपटसृष्टीतील नवोदित तसेच ज्येष्ठ कलाकारांचा यथोचित सन्मान करणा-या संस्कृती कला दर्पण गौरव रजनी पुरस्काराने महाराष्ट्राच्या काना कोपऱ्यात आपली विशेष मोहर उमटवली आहे. गेली १७ वर्षे सातत्याने मनोरंजन कलाकृतींना आणि त्यातील कलावंतांना नावाजणाऱ्या या पुरस्कारांमध्ये चित्रपट, लघुचित्रपट,  व्यावसायिक नाटक, टीव्ही मालिका आणि वृत्त वाहिनी अशा एकूण पाच विभागातील नुकतीच नामांकने जाहीर झाली आहेत. यावर्षी प्रथमच लघुचित्रपट विभागासाठी देखील पुरस्कार जाहीर करण्यात आले, ज्यात दि अंडरकवर गणेशा प्रॉडक्शन निर्मित 'प्रदोष' या लघुचित्रपटाने सर्वोत्कृष्ट होण्याचा मान मिळविला. या लघुचित्रपटाला २५ हजार रोख आणि संस्कृती कलादर्पण रजनीचे सन्मान चिन्ह देऊन गौरविण्यात आले. 
 
यंदाच्या १७ व्या संस्कृती कलादर्पण गौरव रजनी पुरस्काराच्या नाटक विभागातील यादीत सर्वोत्कृष्ट नाटकांमध्ये 'कोडमंत्र', 'साखर खाल्लेला माणूस', 'के दिल अभी भरा नही', तीन पायांची शर्यत' आणि 'यु-टर्न २', या नाटकांचा समावेश आहे. त्यापैकी सर्वोत्कृष्ट नाटक अभिनेता, लेखक, दिग्दर्शक, लक्षवेधी अभिनेत्री आणि सर्वोत्कृष्ट प्रकाश योजना या विभागातील पुरस्काराकरिता चुरशीची स्पर्धा रंगली. चित्रपट विभागातील पुरस्कारांवर सध्याच्या गाजत असलेल्या सिनेमांनी स्थान मिळवले आहे. त्यात 'व्हेंटीलेटर ' आणि 'नातीखेळ' आघाडीवर आहेत, तसेच 'कासव' या चित्रपटाला विशेष लक्षवेधी पुरस्कार आणि 'दशक्रिया' या चित्रपटाला विशेष ज्युरी पुरस्कार जाहीर करण्यात आला. सर्वोत्कृष्ट दिग्दर्शक, संकलन, छायांकन, संगीत, पार्श्वगायक, संवाद, पटकथा, कथा, खलनायक, सहाय्यक अभिनेत्री, सहाय्यक अभिनेता तसेच सर्वोत्कृष्ट अभिनेता आणि सर्वोत्कृष्ट चित्रपट अशा एकूण १३ पुरस्कारांसाठी 'व्हेंटीलेटर ' या सिनेमाला नामांकनं प्राप्त झाली आहेत. त्यानंतर 'नातीखेळ' या चित्रपटालादेखील इतर नामांकनाबरोबरच सर्वोत्कृष्ट चित्रपटांच्या यादीत समावेश करण्यात आला आहे,  
मालिका विभागातील पुरस्कारांमध्ये  कलर्स मराठीवरील  'सरस्वती' आणि 'अस्सं सासर सुरेख बाई' या कार्यक्रमांनी छाप पाडली आहे. सर्वोत्कृष्ट मालिकेच्या पुरस्कार नामांकनात एकूण ५ मालिकामध्ये चुरशीची लढत रंगली आहे. 
  
नाट्य विभागातील पुरस्कारांसाठी एकूण सात सर्वोत्कृष्ट नाटकांची निवड करण्यात आली. यात 'साखर खाल्लेला माणूस', 'कोडमंत्र', 'ह्या गोजिरवाण्या घरात', 'छडा', 'यु टर्न २', 'तीन पायांची शर्यत', 'के दिल अभी भरा नही' या नाटकांचा समावेश आहे. या स्पर्धेत एकूण २४ नाटकांच्या प्रवेशिका दाखल झाल्या होत्या, तसेच १८ व १९ एप्रिल दरम्यान झालेल्या चित्रपट महोत्सवात ११ सिनेमांची अंतिम निवड करण्यात आली, ज्यात घुमा, कासव, नातीखेळ, माचीवरला बुधा, व्हेंटीलेटर, हाफ तिकीट, दशक्रिया, वजनदार, गुरु, पोस्टर गर्ल, किरण कुलकर्णी वर्सेस किरण कुलकर्णी या चित्रपटांनी पहिल्या बाजी मारली होती. चित्रपट विभागातील ज्युरी मंडळात असलेल्या मिलिंद गवळी, अमित भंडारी, रमेश मोरे, राजीव पार्सेकर, सुशांत शेलार आणि समृद्धी पोरे यांनी निवड झालेल्या चित्रपटांचे परिक्षण केले आहे. नाट्यपरिक्षण विभागातील कांचन अधिकारी, प्राजक्ता कुलकर्णी आणि प्रमोद पवार यांनी यंदाच्या नाट्यस्पर्धेच्या परिक्षणाची धुरा सांभाळली होती. यंदाच्या वर्षीचा मराठी चित्रपट क्षेत्रात अतुलनीय कामगिरी करणारे ज्येष्ठ अभिनेते विजय चव्हाण यांना सर्वश्रेष्ठ कलागौरव पुरस्कार प्रदान करण्यात येणार आहे. मालाड येथील गोल्डन लीफ पंचतारांकित हॉटेलमध्ये हा सोहळा दिमाखात पार पडला. 
चित्रपट विभागात प्रथम येणाऱ्या कलाकृतीला बक्षीस रोख रक्कम रुपये दीड लाख तर नाट्य विभातील विजेत्यांना एक लाख रुपये बहाल केले जाणार आहे. तसेच दोन्ही प्रमुख विभागातील संबंधित इतर सहाय्यक विभागातील विजेत्यांना संस्कृती कला दर्पण गौरव रजनीचे सन्मान चिन्ह देऊन गौरविण्यात येईल. ७ मे २०१७ रोजी सायंकाळी ७ वाजता जोगेश्वरी (पूर्व) येथील कमल अमरोही स्टुडियो (कमालीस्तान)मध्ये अंतिम पुरस्कार सोहळा होणार असल्याची माहिती संस्कृती कलादर्पण संस्थेचे अध्यक्ष -संस्थापक चंद्रशेखर सांडवे आणि अध्यक्षा अर्चना नेवरेकर यांनी दिली

नामांकन यादी खालीलप्रमाणे 
 
अर्चना नेवरेकर फाऊंडेशन प्रस्तुत संस्कृती कला दर्पण गौरव रजनी २०१७
 
नाटक नामांकने
 
 सर्वोत्कृष्ट नेपथ्य
१ राजन भिसे ( बंधमुक्त)
२ प्रसाद वालावालकर (कोडमंत्र)
३ राजन भिसे (यु टर्न-2)
 
सर्वोत्कृष्ट प्रकाश योजना
१ भुषण देसाई (तीन पायांची शर्यत)
२ शीतल तळपदे (बंधमुक्त)
३ रवी करमकर (के दिल अभी भरा नही)
 
सर्वोत्कृष्ट संगीत
१ राहुल रानडे (तीन पायांची शर्यत)
२ राहुल रानडे (छडा)
३ साई-पियुष (या गोजिरवाण्या घरात)
४ सचिन-जिगर  (कोडमंत्र)
 
सर्वोत्कृष्ट लेखक
१ विदयासागर अध्यापक (साखर खल्लेला माणूस)
२ अभिजीत गुरु - (तीन पायांची शर्यत)
३ सुरेश जयराम (छडा)
४ आनंद म्हसवेकर (यु टर्न-2)
५ शेखर ढवळीकर ( के दिल अभी भरा नही)
 
सर्वोत्कृष्ट दिगदर्शक
१ अंकुर काकतकर (या गोजिरवाण्या घरात)
२ मंगेश कदम ( के दिल अभी भरा नही)
३ सुरेश जयराम (छडा)
४ चंद्रकांत कुलकर्णी (साखर खल्लेला माणूस)
५ मंगेश कदम (छडा)
 
सर्वोत्कृष्ट सहाय्यक अभिनेत्री
१ रेशमा रामचंद्र (छडा)
२ अदिती द्रविड (या गोजिरवाण्या घरात)
३ सुपिया पाठारे (या गोजिरवाण्या घरात)
 
सर्वोत्कृष्ट सहाय्यक अभिनेता
१ लोकेश गुप्ते (तीन पायांची शर्यत)
२ संकर्षण कुऱ्हाडे (साखर खाल्लेला माणुस)
३ शंतनु मोघे (बंधमुक्त)
 
सर्वोत्कृष्ट अभिनेत्री
१ मुक्ता बर्वे (कोडमंत्र)
२ शर्वरी लोहकरे (तीन पायांची शर्यत)
३ शर्मिष्ठा राऊत (बंधमुक्त)
४ ईला भाटे (यु टर्न-2)
५ शुभांगी गोखले (साखर खाल्लेला माणुस)
 
सर्वोत्कृष्ट अभिनेता
१ मंगेश कदम ( के दिल अभी भरा नही)
२ अमोल कोल्हे (बंधमुक्त)
३ सौरभ गोखले (छडा)
४ प्रशांत दामले (साखर खाल्लेला माणुस)
५ संजय नार्वेकर (तीन पायांची शर्यत)
 
सर्वोत्कृष्ट लक्षवेधी अभिनेत्री
१ लीना भागवत ( के दिल अभी भरा नही)
 
सर्वोत्कृष्ट लक्षवेधी अभिनेता
१ शरद पोंक्षे (हे राम नथुराम)
 
सर्वोत्कृष्ट नाटक
१ कोडमंत्र (अनामिका रसिका निर्मित)  
२ साखर खाल्लेला माणूस (एकदंत क्रिएशन)
३ के दिल अभी भरा नही ( वेद प्रॉडक्शन)
४ तीन पायांची शर्यत (सुयोग आणि झेलू एंटरटेनमेंट)
५ यु टर्न-2 (जिव्हाळा निर्मित)
 
लघुचित्रपट नामांकने
सर्वोत्कृष्ट लघु चित्रपट
प्रदोष – दि अंडरकवर गणेशा प्रोडक्शन
सर्वोत्कृष्ट दिग्दर्शक
सुधांश डिचवलकर – बीप
सर्वोत्कृष्ट अभिनेता
मनोज नागपुरे – द सीड्स
सर्वोत्कृष्ट अभिनेत्री
मृण्मयी गोडबोले – प्रदोष 
 
चित्रपट नामांकने  
 
सर्वोत्कृष्ट कला दिग्दर्शक
१ योगेश इंगळे, विनायक होजगे (घुमा)
२ सुमित्रा भावे (कासव)
३ अमोल शरद बोडके (भॉ)
४ अभिषेक रेडकर (वजनदार)
५ दत्ता लोंढे, किमन टायगर (नातीखेळ)
 
सर्वोत्कृष्ट संकलन
१ रामेश्वर भगत (व्हेंटीलेटर)
२ अमरेंद्र  भोसले (नातीखेळ)
३ मोहित टाकळकर (कासव)
४ अपूर्व साठे (घुमा)
५ फौजल- इम्रान  (हाफ तिकीट)
 
 सर्वोत्कृष्ट छायांकन
१ संजय मेमाणे (हाफ तिकीट)
२ अमरेंद्र  भोसले (नातीखेळ)
३ सविता सिंग (व्हेंटीलेटर)
४ योगेश कोळी (घुमा)
५ धनंनजय कुलकर्णी
 
 सर्वोत्कृष्ट रंगभूषा
१ सचिन लोलवलेकर (हाफ तिकीट)
२ सेरिना टस्किरा (व्हेंटीलेटर)
३ महादेव दळवी / आतिष आंबेकर (माचीवरला बुधा)
 
सर्वोत्कृष्ट संगीत
१ योगिता चितळे (मुंबई टाईम)
२ रोहन-रोहन (व्हेंटिलेटर)
३ ऋषिकेश/सौरभ/जसराज (घुमा)
४ अमितराज (पोस्टर गर्ल)
५ अविनाश, विश्वजीत (वजनदार)
 
 सर्वोत्कृष्ट पार्श्वगायिका
१ सायली खरे ( अपने ही रंग मे- कासव)
२ मुग्धा सबनीस ( पसायदान- घुमा)
३ आनंदि जोशी ( एक सोहळा निराळा- फॅमिली कट्टा)
४ शाल्मली खोलगडे (तु तु ताना – वजनदार)
५ अमृता फडणवीस ( कालचक्र कालचक्र – कालचक्र)
 
सर्वोत्कृष्ट पार्श्वगायक
१ आदर्श शिंदे (आवाज वाढव – पोस्टर गर्ल)
२ रोहन-रोहन (बाबा- व्हेंटिलेटर)
३ रोहित राऊत (गोलू पोलू- वजनदार)
४ शंकर महादेवन ( मुंबई टाईम)
५ पृथ्वीराज माळी (फळ्यावरती पाढं – दशक्रिया)
 
सर्वोत्कृष्ट गीतरचना
१ गुरु ठाकुर (मुंबई टाईम)
२ वैभव जोशी (पोस्टर गर्ल)
३ सुनिल सुकथनकर (कासव)
४ क्षितिजि पटवर्धन (हाफ तिकीट)
५ संजय कृष्णाजी पाटील (दशक्रिया)
 
सर्वोत्कृष्ट संवाद
१ सुमित्रा भावे (कासव)
२ राजेश म्हापूसकर ( व्हेंटिलेटर)
३ महेश रावसाहेब काळे (घुमा)
४ प्रशांत दळवी (फॅमिली कट्टा)  
५ शिवकांता सुतार ( नातीखेळ)
 
सर्वोत्कृष्ट पटकथा
१ राजेश म्हापूसकर ( व्हेंटिलेटर)
२ उमेश पाडालकर, अरविंद जगताप, सपना सरन, नागेश भोसले (नातीखेळ)
३ महेश रावसाहेब काळे (घुमा)
 
सर्वोत्कृष्ट कथा
१ राजन खान (नातीखेळ)
२ गो. नि  दांडेकर (माचीवरला बुधा)
३ महेश रावसाहेब (घुमा)
४ राजेश म्हापुसकर (व्हेंटीलेटर)
५ साकीर शेख (मॅरेथाॅन जिंदगी)
 
सर्वोत्कृष्ट दिग्दर्शक
१ राजेश म्हापुसकर – व्हेंटीलेटर
२ नागेश भोसले – नातीखेळ
३ समीर पाटील – पोस्टर गर्ल
४ महेश रावसाहेब काळे – घुमा
५ सुमित्रा भावे आणि सुनील सुकथनकर – कासव
 
सर्वोत्कृष्ट बालकलाकार
१ शुभम मोरे – हाफ तिकीट
२ आर्य आढाव – दशक्रिया
३ विनायक पोतदार – हाफ तिकीट
४ आदेश आवारे – घुमा
५ ओमकार घाडी – कासव

सर्वोत्कृष्ट खलनायक
१ गणेश यादव – नगरसेवक एक नायक
२ निलेश दिवेकर - व्हेंटीलेटर
३ नागेश भोसले – नातीखेळ
 
सर्वोत्कृष्ट सहाय्यक अभिनेत्री
१ उषा नाईक – हाफ तिकीट
२ सई ताम्हणकर – फॅमिली कट्टा
३ नम्रता आवटे - व्हेंटीलेटर
४ तेजस्विनी विठ्ठल – घुमा
 
सर्वोत्कृष्ट सहाय्यक अभिनेता
१ आशुतोष गोवारीकर – व्हेंटीलेटर
२ सतीश आळेकर – व्हेंटीलेटर
३ प्रमोद कसवे – घुमा
४ मनोज जोशी – दशक्रिया
५ उमेश जगताप – नातीखेळ
 
सर्वोत्कृष्ट अभिनेत्री
१ राधा कुलकर्णी – नातीखेळ
२ प्रियांका बोस-कामत – हाफ तिकीट 
३ इरावती हर्षे – कासव
४ सोनाली कुलकर्णी – पोस्टर गर्ल
५ क्रांती रेडकर – किरण कुलकर्णी v/s किरण कुलकर्णी
 
सर्वोत्कृष्ट अभिनेता
१ मिलिंद शिंदे – नातीखेळ
२ शरद यादव – घुमा
३ सुहास पळशीकर – माचीवरला बुधा
४ जितेंद्र जोशी - व्हेंटीलेटर
५ अंकुश चौधरी – गुरु
 
सर्वोत्कृष्ट सामाजिक चित्रपट
१ कालचक्र – सेटलाईट पिक्चर्स
२ किरण कुलकर्णी v/s किरण कुलकर्णी – ओम प्राडक्शन
३ नगरसेवक एक नायक – जश पिक्चर्स