गुरूवार, 25 एप्रिल 2024
  1. मनोरंजन
  2. मराठी सिनेमा
  3. नाट्य-चित्र गप्पा
Written By
Last Modified: बुधवार, 4 ऑक्टोबर 2023 (13:00 IST)

Gautami Patil गौतमीला या जिल्ह्यात नो एन्ट्री

gautami patil
Gautami Patil Kokan Show Cancel: येत्या 7 व 8 ऑक्टोबरला कुडाळ आणि कणकवलीमध्ये अवघ्या महाराष्ट्राला वेड लावणाऱ्या गौतमी पाटीलचे  लावणी आणि डीजे शो आयोजित करण्यात आला होता.  याचे पोस्टर देखील सोशल मीडियावर तुफान व्हायरल झाले होते. मात्र, आता अचानक तिचे शो रद्द करण्यात आले आहेत. पण काही तांत्रिक कारणांमुळे हा कार्यक्रम रद्द करण्यात आल्याचे आयोजकांनी जाहीर केले आहे.
 
 मात्र, गौतमी पाटीलचा कार्यक्रम जरी रद्द झाला असला, तरी याच दिवशी म्हणजे 7 ऑक्टोबर रोजी आयोजित करण्यात आलेला 'कॉमेडीचे सुपरस्टार' हा कार्यक्रम ठरल्याप्रमाणे पार पडणार आहे.  आता या कार्यक्रमाच्या तिकीट विक्रीला सुरुवात झाली आहे. हा कार्यक्रम ज्या ठिकाणी आयोजित करण्यात आला आहे, त्या देवगड अम्युझमेंट सेंटरचे धैर्यशील पाटील यांनी यासंदर्भात एक पत्र जारी केले आहे.