गौतमी पाटीलच नवीन सॉंग दिसला ग बाई दिसला प्रेक्षकांच्या भेटीला
प्रसिद्ध नृत्यांगना गौतमी पाटील ही नेहमी चर्चेत असते. तिचे नवीन गाणे प्रेक्षकांच्या भेटीला आलं आहे. या गाण्यात मराठमोळा अभिनेता ललित प्रभाकर सुद्धा दिसत आहे. गाण्याचे बोल आहे दिसला ग बाई दिसला. हे गाणं पिंजरा चित्रपटातल्या गाण्याचं रिमेक आहे.
या गाण्यातून गौतमीने आपल्या नृत्याने प्रेक्षकांना घायाळ केलं आहे. या व्हिडीओ मध्ये तिचा वेगळा अंदाज दिसत आहे. तिला साथ देण्यासाठी गाण्यात ललित प्रभाकर देखील आहे. यामुळे हे गाणं अधिकच भावलं आहे. हे गाणं प्रेमाची गोष्ट 2 या चित्रपटाचे आहे. या गाण्यात गौतमीची धमाकेदार अदाकारी पाहायला मिळत आहे.
हे गाणं 1972 च्या सदाबहार चित्रपट पिंजरा चित्रपटातील दिसला गं बाई दिसला या गाण्याचं रिमेक आहे. या गाण्याचा रिमेक पाहून नेटकऱ्यांना निराशा झाली असून या गाण्यासाठी ट्रोलिंग होत आहे. काहींनी या गाण्याचं कौतुक केलं असून काहींनी गाण्याची वाट लावली असे म्हटले आहे.
नेटकरी या गाण्यावर आपापली प्रतिक्रिया देत आहे. सध्या गौतमीचे दिसला गं बाई दिसला गाणं ट्रेंडिंगवर आहे.