बुधवार, 8 जानेवारी 2025
  1. मनोरंजन
  2. मराठी सिनेमा
  3. नाट्य-चित्र गप्पा
Written By
Last Modified: मंगळवार, 1 ऑगस्ट 2023 (07:46 IST)

Sai Tamhankar तुही मला आज एक वचन दे, तू तुझा रुसवा-फुगवा विसरुन तू पुन्हा येशील - सई ताम्हणकर

sai tamhankar
Sai Tamhankarसई ताम्हणकर नुकतंच ‘खुपते तिथे गुप्ते’ या कार्यक्रमात सहभागी झाली होती. यावेळी तिने मराठी चित्रपट पाहणाऱ्या प्रेक्षकांना फोन लावला.
 
झी मराठीने नुकतंच या कार्यक्रमातील काही व्हिडीओ शेअर केले आहेत. या कार्यक्रमावेळी सई ताम्हणकरने मराठी चित्रपट बघणाऱ्या प्रत्येक प्रेक्षकाला फोन करण्याची इच्छा व्यक्त केली. त्यावेळी तिने भावुक शब्दात संवाद साधला.
 
“हाय कसा आहेस, सगळ्यात आधी खूप धन्यवाद, आतापर्यंत दिलेल्या प्रेमाबद्दल, सदिच्छांबद्दल आणि मला सर्वस्वी स्वीकारुन मी जिथपर्यंत पोहोचली आहे तिथपर्यंत पोहोचवण्याबद्दल. पण गेली दोन-चार वर्ष मला असं वाटतंय की तू रुसलास बाबा… काय कारण आहे.
 
मला माहितीये की आता तुझे नवीन मित्र झालेत, एकदम नवखे मित्र आहेत. त्यांच्याबरोबर तू जास्त असतोस. पण म्हणून मग तू जुन्या मित्रांना विसरणार आहेस का? तुही मला आज एक वचन दे, तू तुझा रुसवा-फुगवा विसरुन तू पुन्हा येशील”, असे सई यावेळी म्हणाली.