शुक्रवार, 27 डिसेंबर 2024
  1. मनोरंजन
  2. मराठी सिनेमा
  3. नाट्य-चित्र गप्पा
Written By
Last Modified: रविवार, 30 जुलै 2023 (16:06 IST)

महाराष्ट्राची हास्य जत्रा पुन्हा येणार, प्रेक्षकांची मागणी

सोनी मराठी वरील महाराष्ट्राची हास्यजत्रा हा प्रेक्षकांच्या मनात पोहोचला आहे. या कार्यक्रमाच्या कलाकारांचा चाहत्या वर्ग खूप मोठा आहे. या कार्यक्रमाच्या कलाकारांनी प्रेक्षकांना खूप हसवलं आहे. गेल्या काही दिवसांपासून या कार्यक्रमाने ब्रेक घेतला असून सध्या सोमवार ते शनिवार रात्री 9 वाजता 'कोण होणार करोडपती' सुरु आहे. आता येत्या 14 ऑगस्ट पासून 'महाराष्ट्राची हास्यजत्रा पुन्हा एकदा नव्या हंगामासह प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. या नव्या पर्वाच्या प्रोमो सोशल मीडियावर शेअर करण्यात आला आहे. या कार्यक्रमात प्रियदर्शिनी इंदलकर, वनिता खरात, समीर चौघुले, शिवाली परब, ईशाडे , आणि दत्तू मोरे झळकणार आहे. 
 
पुढील महिन्यापासून महाराष्ट्राची हास्यजत्रा पुन्हा प्रेक्षकांच्या भेटीला नव्या रूपात येणार आहे. सोमवार ते गुरुवार 14 ऑगस्ट पासून रात्री 9 वाजता प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. सोनी मराठी कडून याचे एक प्रोमो शेअर करण्यात आले आहे. यावर प्रेक्षकांनी आपापल्या प्रतिक्रिया दिल्या आहे. प्रेक्षकांनी  विशाखा सुभेदार, ओंकार भोजने या कलाकारांना पुन्हा या पर्वणीत समावेश करण्याची मागणी केली आहे. 
 
Edited by - Priya Dixit