स्टार प्रवाह वरील आता लोकप्रिय मालिका रंग माझा वेगळा घेणार प्रेक्षकांचा निरोप
स्टार प्रवाह वरील दररोज सोमवार ते शनिवार प्रसारित होणारी मालिका सह कुटुंब सह परिवार लवकरच प्रेक्षकांचा निरोप घेणार असून आता अजून एक लोकप्रिय मालिका रंग माझा वेगळा देखील लवकरच प्रेक्षकांचा निरोप घेणार आहे. गेल्या 3 वर्षांपासून ही मालिका प्रेक्षकांचं मनोरंजन करत आहे. या मालिकेत दीपा आणि कार्तिक या दोघांची लव्ह स्टोरी दाखवण्यात आली आहे. कार्तिक आणि दीपाने प्रेक्षकांच्या मनात घर केले आहे. आता या मालिकेच्या शेवटच्या भागाचं चित्रीकरण 22 जुलै रोजी झालं. आता या मालिकेच्या जागी तेजश्री प्रधानची नवी मालिका 'प्रेमाची गोष्ट' येणार आहे. ही मालिका आहे मुक्ता नावाच्या एका मुलीची ही कधीही आई होऊ शकत नाही. पण तिच्या आईला नेहमी असं वाटत असत की मुक्ताचं लग्न व्हावं. या साठी ती प्रयत्नात असते. तेजश्री प्रधान आणि राज हंचनाळे हे मुख्य भूमिकेत आहे.शुभांगी गोखले, संजीवनी जाधव हे कलाकार देखील या मालिकेत दिसणार आहे.
तेजश्री प्रधान मुक्ताची भूमिका आणि राज हंचनाळे हा सागरची भूमिका साकारत आहे. हे दोघे शेजारीत राहतात. सागर एका मुलीचा वडील आहे. त्याची पत्नी नसल्यामुळे तो दुसरं लग्न करत नाही. कारण त्याला आपल्या मुलींसाठी आईसारखं प्रेम देणारी कोणीच नाही असं म्हणत तो लग्न करत नाही. सागरची मुलगी सईचं आणि मुक्ताचं चांगलाच जमत. सागर आणि मुक्ता हे एकमेकांना चांगलेच ओळखतात. आता हे दोघे कसे एकत्र येतात हे पाहण्यासारखे आहे. आता लवकरच ही मालिका प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. या
Edited by - Priya Dixit