1. मनोरंजन
  2. मराठी सिनेमा
  3. नाट्य-चित्र गप्पा
Written By
Last Modified: शुक्रवार, 28 जुलै 2023 (13:41 IST)

स्टार प्रवाहाची ही मालिका घेणार प्रेक्षकांचा निरोप

social media
सध्या स्टार प्रवाहावरील मालिकानीं  प्रेक्षकांच्या घरात आणि मनात स्थान निर्माण केले आहे. संध्याकाळी स्टार प्रवाहावर लोकप्रिय मालिकांची रेलचेल असते. आई कुठे काय करते, सह कुटुंब सह परिवार, रंग माझा वेगळा आणि सुख म्हणजे नक्की काय असतं. या मालिकांनी प्रेक्षकांचा मनात घर केले आहे. 

पण सध्या या मालिका रेटत आहे. यातील काही मालिकांमध्ये आता नवीनता नसल्यामुळे त्यांना उगाच वाढवत असल्यामुळे प्रेक्षकांची कमी पसंती मिळत आहे. त्यामुळे मालिकांची टीआरपी घसरत आहे. प्रेक्षकांची नाराजी या मालिकेसाठी दिसत आहे. आता लवकरच सह कुटुंब सह परिवार ही मालिका प्रेक्षकांचा निरोप घेणार असल्याची माहिती मिळाली आहे. 

नुकतंच या मालिकेतील शेवटच्या सीनच चित्रीकरण झालं. ही मालिका 24 फेब्रुवारी 2020 पासून सुरु झाली होती. आता ही  मालिका प्रेक्षकांचा निरोप घेत आहे. ही मालिका एकत्र कुटुंब पद्धतीवर आधारित असल्यामुळे प्रेक्षकांना आवडली. मात्र आता या मालिकेत कथानक उगाच लांबवतात असल्याचं प्रेक्षकांचं म्हणणं आहे. त्यामुळे आता या मालिकेने प्रेक्षकांचं निरोप घेण्याचं ठरवलं आहे. या मालिकेतील शेवटच्या सीनचं चित्रीकरण होत असताना मालिकेतील कलाकार भावुक झाले. अभिनेता सुनील बर्वे यांनी मालिकेत सूर्यदादांची भूमिका साकारली 
 
 
अभिनेता सुनील बर्वे याने एक पोस्ट शेअर करत मालिका निरोप घेत असल्याचं सांगितलं आहे. 
 
 Edited by - Priya Dixit