शुक्रवार, 27 डिसेंबर 2024
  1. मनोरंजन
  2. मराठी सिनेमा
  3. नाट्य-चित्र गप्पा
Written By
Last Modified: रविवार, 25 जून 2023 (16:44 IST)

मराठमोळा अभिनेता अजिंक्य ननावरे अडकणार लग्नबंधनात

social media
झी मराठी वाहिनी वरील मालिका सातव्या मुलीची सातवी मुलगी मालिकेत अद्वैत आणि नेत्राच्या लग्नाची चर्चा सुरु आहे. मालिकेत अद्वैतची भूमिका अजिंक्य ननावरे आणि नेत्राची भूमिका तितिक्षा तावडे साकारत आहे. मालिकेमुळे अद्वैत आणि नेत्राने प्रेक्षकांच्या घरात आणि मनात जागा केली आहे. अद्वैत म्हणजे अजिंक्यचा चाहत्यांमध्ये वाढ झाली आहे. अजिंक्य गेल्या काही वर्षांपासून अभिनेत्री शिवानी सुर्वेला डेट करत आहे.  
 
शिवानी सुर्वे या अभिनेत्रीने बिगबॉस मराठीच्या दुसऱ्या पर्वतामध्ये सहभाग घेतला होता. शिवानी आणि अजिंक्यने या शो मध्ये आपल्या नात्याची कबुली सर्वांसमोर दिली होती. दोघांनी कपल टेटू देखील काढला होता. 

अजिंक्य आणि  शिवानी आता नवीन आयुष्याची सुरुवात करण्याचा तयारीत आहे. लवकरच शिवानी महेश मांजरेकर दिग्दर्शित ऐतिहासिक चित्रपटात काम करणार आहे. अजिंक्यने असावा सुंदर स्वप्नांचा बंगला, सख्या रे, आणि गर्ल्स हॉस्टेल या मालिकेत काम केलं आहे. अजिंक्यने त्याच्या खऱ्या आयुष्यातील लग्नाबाबत भाष्य केलं असून त्याला लग्नाची तारीख काढली आहे का असं प्रश्न विचारल्यावर तो म्हणाला हो पण त्याला अजून वेळ आहे. 
 
Edited by - Priya Dixit