1. मनोरंजन
  2. मराठी सिनेमा
  3. नाट्य-चित्र गप्पा
Written By
Last Modified: बुधवार, 21 जून 2023 (14:05 IST)

Subhedar Teaser out : चित्रपट सुभेदारचा टिझर रिलीज

social media
छत्रपती शिवाजी महाराजांचे लाडके शूरवीर मावळे तान्हाजी मालसुरे यांच्या पराक्रमावर आधारित चित्रपट सुभेदारचा टिझर रिलीज झाला आहे. अभिनेते- लेखक -दिग्दर्शक दिग्पाल लांजेकर यांनी शिवराज अष्टकाच्या माध्यमातून महाराष्ट्राचे आराध्य छत्रपती शिवाजी महाराजांना सुभेदाराच्या माध्यमातून आदरांजली दिली आहे. या चित्रपटाचा टिजर रिलीज झाला असून हा चित्रपट अंगावर काटा आणणारा आहे. 

सुभेदारांच्या पराक्रमाची चाहूल देणारा हा टीजर रक्तामंदी उसळं तापता लाव्हा, शिवराय शब्दाची आन आम्हाला अशा गाण्याने सजलेला आहे. या टीजर मध्ये सुभेदारांचा आवाज आणि स्वराज्य प्रेम दिसून येत. 

सुभेदार चित्रपट येत्या 25 ऑगस्ट रोजी प्रदर्शित होणार असून या टीजरला शेअर करत दिग्दर्शक दिग्पाल लांजेकर लिहितात, आई भवानीच्या चरणी हे अर्पण करत आहो. श्री शिवराज अष्टकातील पाचवे चित्रपुष्प'सुभेदार' सिंहगडाचा पोवाडा 25 ऑगस्ट रोजी गाजणार.
 
 
Edited by - Priya Dixit