रविवार, 12 जानेवारी 2025
  1. मनोरंजन
  2. मराठी सिनेमा
  3. नाट्य-चित्र गप्पा
Written By
Last Modified: सोमवार, 12 जून 2023 (14:16 IST)

मराठमोळी अभिनेत्री मीराचा अपघात

accident
Instagram
मराठी अभिनेत्री मीरा जोशीचा  मुंबई-पुणे हायवेवर भीषण अपघात झाला आहे. मीराने या अपघाताविषयी स्वत: सोशल मीडियाच्या माध्यमातून माहिती दिली आहे. मीराने कारचा व्हिडीओ शेअर केला आहे. हा व्हिडीओ शेअर करत तिने ‘क्रॅश्ड अँड मिसिंग’असे कॅप्शन दिले आहे.
 
पण सुदैवाने या अपघातामध्ये तिला दुखापत झाली नाही. मात्र गाडीचे मोठे नुकसान झाले आहे. तिने गाडीचे व्हिडीओ शेअर करत कृतज्ञता व्यक्त केली आहे.
 

मीराने तिच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर कारचा व्हिडीओ शेअर केला आहे. या व्हिडीओमध्ये तिने कारला तिची मैत्रीण म्हटले आहे. ती व्हिडीओमध्ये बोलत आहे की, “प्रिय सखी, किती आणि कुठे-कुठे भटकलो ना आपण. रात्र-दिवस, ऊन-वारा, पाऊस चढ उतार काहीही असो आपण एकमेकींची काळजी घेतली. पण आज इतका भीषण अपघात होऊनही तू स्वतःला संपवणे पत्करलेस आणि मला किरकोळ ओरखडाही येऊ दिला नाहीस. थँक्यू.