गुरूवार, 9 जानेवारी 2025
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: रविवार, 11 जून 2023 (10:12 IST)

Accident : समृद्धी महामार्गावर अपघातात चिमुकला ठार, 5 जण जखमी

accident
समृद्धी महामार्गावर अपघातांचं सत्र सुरु आहे. हज यात्रेसाठी मुंबई वरून छत्रपती संभाजीनगर कडे निघालेल्या भरधाव कारचा वैजापूरजवळ टायर फुटून कार अनियंत्रित होऊन अपघात झाला. या अपघातात एक वर्षाचा चिमुकला ठार झाला तर कुटुंबातील पाच जण जखमी झाले. अखतर रझा असे या मयत चिमुकल्याचे नाव असून आझाद अली खान, आफताब अली, खुशबू आलं खान, यास्मिन खान, सोहेल खान जखमी झाले आहे. जखमींना तातडीने रुग्णालयात दाखल केले असून पुढील उपचारासाठी येवला पाठवले आहे. 
 
सदर कुटुंब बिहार राज्यातील छपरा येथील असून मुंबईतील वाशीत राहणारे होते. ते 17 जून रोजी गया येथून विमानाने हजयात्रेसाठी जाणार होते. त्यासाठी ते आपल्या गावी जाण्यासाठी निघाले होते. 
 
समृद्धी महामार्गावर संभाजी नगर कडे जात असताना जांबरगाव व लासूरगाव दरम्यान कारचे टायर फुटून कार अपघातग्रस्त झाली. या अपघातात गाडीचे खूप नुकसान झाले.
घटनेची माहिती मिळतातच स्थानिकांनी पोलिसांसह घटनास्थळी धाव घेतली. हजयात्रेसाठी निघालेल्या कुटुंबाचा अपघात होऊन चिमुकला ठार झाल्यामुळे परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे.  
 
Edited by - Priya Dixit