मंगळवार, 3 डिसेंबर 2024
  1. मनोरंजन
  2. मराठी सिनेमा
  3. नाट्य-चित्र गप्पा
Written By
Last Modified: गुरूवार, 10 नोव्हेंबर 2016 (16:30 IST)

ऑलराऊंडर हंसराज

बीडसारख्या छोट्याशा गावातून आलेल्या हंसराज जगताप या बालकलाकाराने अत्यंत कमी वयात आपल्या अभिनयाचे नाणे खणखणीत वाजवले. 'धग' या सिनेमात किसन्याची भूमिका साकारून अभिनयात आपले नाव सार्थ ठरविले. सर्वोत्कृष्ट बालकलाराचा या राष्ट्रीय पुरस्कार मिळवणारा हंसराजला अभिनयाइतकचं क्रिकेट आणि डान्सचंही तितकचं वेड आहे. आपल्या चित्रपटाच्या बिझी शेड्यूलमधून क्रिकेट तसचं डान्ससाठी वेळ काढतो. क्रिकेट हा त्याचा आवडीचा खेळ असला तरी तो पोहण्यातही उत्तम आहे. हंसराजची नृत्याची आवड लक्षात घेऊन त्याच्या आईने त्याला डान्सच्या क्लास घातले. आतापर्यंत 200 ते 250 पुरस्कार मिळाले असून वेस्टर्न तसेच पारंपारिक नृत्यही शिकला आहे.
 
आपल्या अभिनयासाठी राष्ट्रीय पुरस्कार मिळवणा-या हंसराजने सिनेसृष्टीत वेगळे स्थान निर्माण केले आहे. फुटबाॅल तसेच बास्केटबॉल या खेळातचीही आवड आहे. राखणदार, स्लॅमबुक, मनातल्या उन्हात, यारी दोस्ती यांसारख्या सिनेमांमधून आपल्याला त्याचे अभिनय कौशल्य पाहायला मिळाले आहे. 'आयटमगिरी' या सिनेमात हंसराज एका वेगळ्या अंदाजात पाहायला मिळणार आहे. अशा या ऑलराऊंडर  हंसराजचे पांजरपोळ, जांभुळभेट, झिप-या, गजा तसेच संस्कृती हे आगामी सिनेमे आपल्याला लवकरचं पाहायला मिळणार आहे.