सोमवार, 23 डिसेंबर 2024
  1. मनोरंजन
  2. मराठी सिनेमा
  3. नाट्य-चित्र गप्पा
Written By

‘रंग माझा वेगळा’ तून हर्षदा खानविलकर नव्या रुपात दिसणार

स्टार प्रवाहवर येत्या 30 ऑक्टोबरपासून सुरु होणाऱ्या ‘रंग माझा वेगळा’ या मालिकेतून मराठी अभिनेत्री हर्षदा खानविलकर नव्या रुपात पुन्हा एकदा प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. सौंदर्या इनामदार असं तिच्या या व्यक्तिरेखेचं नाव असून हर्षदाचा निराळा अंदाज या मालिकेत पाहायला मिळणार आहे.
 
‘रंग माझा वेगळा’ या मालिकेतील त्यांच्या व्यक्तिरेखेविषयी सांगताना हर्षदा म्हणाल्या, ‘या भूमिकेसाठी मी प्रचंड उत्सुक आहे. ‘पुढचं पाऊल’ या मालिकेने माझं विश्व बदललं. 3 वर्षांपेक्षा अधिक काळ मी ज्या वाहिनीसोबत काम केलं, त्या स्टार प्रवाह वाहिनीसोबत पुन्हा एकदा काम करताना माहेरी आल्याची भावना आहे. माझं नव्याने आयुष्य सुरु होत आहे, असं म्हटलं तरी चालेल. सौंदर्या इनामदार नावाप्रमाणेच सौंदर्यावर प्रेम करणारी अत्यंत करारी अशी बिझनेस वुमन आहे. तुम्ही सुंदर असाल, तर जगावर राज्य करु शकता हा विचार मानणारी आणि त्याप्रमाणे वागणारी अशी सौंदर्या. ‘पुढचं पाऊल’च्या अक्कासाहेबांवर प्रेक्षकांनी मनापासून प्रेम केलं, आता सौंदर्यावरही तितकंच प्रेम कराल हा आत्मविश्वास आहे’.