शनिवार, 25 जानेवारी 2025
  1. मनोरंजन
  2. मराठी सिनेमा
  3. नाट्य-चित्र गप्पा
Written By
Last Modified: बुधवार, 4 ऑगस्ट 2021 (16:27 IST)

हृता लवकरच येणार प्रेक्षकांच्या भेटीला

एका नव्या शोमध्ये हृता अभिनेता अजिंक्य राऊतच्या जोडीला दिसणार आहे. शोच्या इतर स्टार कास्टबद्दल सध्या काहीच माहिती नाही. 30 ऑगस्टपासून झी मराठीवर 'मन उडु उडु झालं' ही मालिका सोमवार ते शनिवारी सायंकाळी 7.30 वाजता भेटीला येणार आहे. या मालिकेत हृता दुर्गुळे दिसणार आहे. हृतासोबत या मालिकेत अजिंक्य राऊत भेटीला येणार आहे. हृताने वैदेही या भूमिकेतून प्रेक्षकांचं खूप मन जिंकल. तिचा स्वतःचा एक प्रेक्षक वर्ग आहे. असं असताना हृता आणि अजिंक्य राऊत ही फ्रेश जोडी प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. 
 
वर्क फ्रंटवर, हृता शेवटच्या टीव्ही शो सिंगिंग स्टारमध्ये दिसली होती जिथे तिने शो होस्ट केला होता. लोकप्रिय टीव्ही शो फुलपाखरू मध्ये यशोमन आपटेच्या विरूद्ध हृता वैदेहीच्या भूमिकेसाठी परिचित आहे. अभिनेत्रीने अलीकडेच मनोरंजन क्षेत्रात 8 वर्षे पूर्ण केली. हृता ने तिच्या नाटक, टेलिव्हिजन शो आणि चित्रपटांमध्ये तिच्या अभिनयाची क्षमता सिद्ध केली आहे.