सोमवार, 23 डिसेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. मुंबई
Written By
Last Modified: बुधवार, 4 ऑगस्ट 2021 (15:59 IST)

'या' दुर्मिळ आजारावर नायर रुग्णालयात मोफत उपचार होणार

काही दिवसांपूर्वी स्पायनल मस्क्युलर अट्रोफी या दुर्मिळ आजाराशी झुंज देणाऱ्या वेदिका शिंदे चिमुकलीचा मृत्यू झाला.वेदिकाला उपचारासाठी दीड महिन्यांपूर्वी १६ कोटींचे इंजेक्शन देण्यात आले होते. मात्र तरीही वेदिकाची मृत्यूशी झूंज अपयशी ठरली.परंतु आता मुंबईतील नायर रुग्णालयात एसएमएवर मोफत उपचार दिला जाणार आहे. नायर रुग्णालयाच्या शतकपूर्तीनिमित्त एसएमए आजार असलेल्या १९ रुग्णांना नवजीवन देण्याच्या कार्यक्रमाचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या हस्ते उद्घाटन करण्यात आले.
 
नायर रुग्णालयाला १०० वर्षे पूर्ण झाली आहेत.१९२१ मध्ये सुरू केलेले नायर रुग्ण शतकपूर्ती साजरी करत आहे. यानिमित्ताने रुग्णालयाच्या माध्यमातून अनेक कार्यक्रम आयोजित करण्यात आले आहे.यामध्ये एसएमएसारखा दुर्मिळ आजार असणाऱ्या १९ रुग्णांना कोट्यावधी रुपयांचे प्रभाव इंजेक्शन मोफत देणाच्या कार्यक्रम देखील आहे. यामुळे १९ एसएमएग्रस्त असलेल्या रुग्णांना नवजीवन मिळणार आहे.
 
एसएमए हा दूर्मिळ आजार १० हजार मुलांपैकी एकाला मुलाला होतो.या आजाराच्या उपचारासाठी लागणारे इंजेक्शनाची किंमत ही सर्वसामान्यांच्या आवाक्या बाहेरची आहे.पण नायरमध्ये हेच इंजेक्शन मोफत दिले जाणार आहे. बायोजेन कंपनीकडून ‘स्पिनराज’ इंजेक्शन हे रुग्णांना आयुष्यभरासाठी मोफत दिले जाणार आहे. अमेरिकेतील एनजीओ डायरेक्ट रिलीफ हे नायर रुग्णालयाला यासाठी मदत करत आहे.