1. मनोरंजन
  2. मराठी सिनेमा
  3. नाट्य-चित्र गप्पा
Written By
Last Updated : बुधवार, 14 फेब्रुवारी 2024 (11:03 IST)

कार्यक्रमात श्रेयस तळपदे भावुक झाला, अश्रू अनावर, म्हणाला-

अभिनेता श्रेयस तळपदेला 15 डिसेंबर 2023 रोजी  हृदय विकाराचा झटका आला.त्याच्यावर अँजिओप्लास्टी करण्यात आली.या कठीण काळात त्याच्या पत्नी आणि मित्रांनी त्याला साथ दिली. आता अभिनेता श्रेयस हा पूर्णपणे बरा झाला असून पुन्हा मोठ्या पडद्यावर कमबॅक करण्यासाठी सज्ज आहे. 
 
महेश मांजरेकर दिग्दर्शित 'ही अनोखी गाठ' या चित्रपटातून श्रेयस पुन्हा प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. या चित्रपटात शरद पोंक्षे, गौरी इंगवले, सुहास जोशी, ऋषी सक्सेना हे कलाकार देखील झळकणार आहे. नुकताच या चित्रपटाचा ट्रेलर लॉन्च सोहळा पार पडला.या वेळी कार्यक्रमात चाहत्यांचे पत्र वाचून अभिनेता श्रेयस व त्याच्या पत्नी दीप्तीचे अश्रू अनावर झाले. तो म्हणाला- माझ्यासाठी हा खूप खास क्षण आहे. मी खरंच आता रडत आहे.

माझ्याकडे बोलण्यासाठी शब्दच नाही. माझ्या ओबत जे घडलं ते कोणत्या वैऱ्यासोबत देखील घडू नये. आता त्याची उजळणी नको. मला या कठीण काळात अनेकांचा प्रेम, आशीर्वाद, जप, प्रार्थना लाभले. लोकांनी माझ्यासाठी जे काही केलं मी त्याचे ऋण फेडू शकणार नाही. हा माझा नवीन जन्म आहे. मी प्रत्येकाचे आभार मानू इच्छितो.या काळात माझी पत्नी दीप्ती ही सावित्री ठरली. तिने मृत्यूच्या दारातून मला पुन्हा बाहेर काढून आणले. असं श्रेयस म्हणाला. 
 
 Edited by - Priya Dixit