सोमवार, 23 डिसेंबर 2024
  1. मनोरंजन
  2. मराठी सिनेमा
  3. नाट्य-चित्र गप्पा
Written By
Last Modified: बुधवार, 25 जानेवारी 2023 (19:10 IST)

जिओ स्टुडिओजच्या आगामी तमिळ चित्रपट "अप्पथा" ने शांघाय कोऑपरेशन ऑर्गनायझेशन फिल्म फेस्टिव्हलची होणार सुरवात

tamil picture
पद्मश्री आणि राष्ट्रीय पुरस्कार विजेते चित्रपट निर्माते प्रियदर्शन दिग्दर्शित जिओ स्टुडिओज आणि वाइड अँगल क्रिएशन्सचा आगामी तमिळ चित्रपट अप्पाथा हा शांघाय कोऑपरेशन ऑर्गनायझेशन फिल्म फेस्टिव्हलमध्ये ओपनिंग फिल्म म्हणून निवडण्यात आला आहे. भारत सरकार, माहिती आणि प्रसारण मंत्रालय तसेच  SCO कौन्सिल ऑफ हेड ऑफ स्टेटच्या सहकार्याने राष्ट्रीय चित्रपट विकास महामंडळामार्फत हा महोत्सव आयोजीत करण्यात आला आहे. 27 जानेवारीला मुंबईत फिल्म्स डिव्हिजन कॉम्प्लेक्समध्ये याची स्क्रिनिंग होणार आहे.
 
या चित्रपटाच्या निवडीबद्दल बोलताना प्रियदर्शन सांगतात, “या प्रतिष्ठित सोहळ्यात ओपनिंग फिल्म म्हणून अप्पथाची निवड होणे ही गौरवशाली बाब आहे आणि याचा आम्हाला गौरव वाटतो.  ही साधी आणि सुंदर कथा माझ्यापर्यंत पोहोचवल्याबद्दल मी माझे निर्माते जिओ स्टडिओज आणि वाईड क्रिएशन्स यांचे आभार मानू इच्छितो.  या चित्रपटासाठी सहकार्य करणे आणि उर्वशी सारख्या अभूतपूर्व प्रतिभेसोबत तिच्या माईलस्टोन कारकीर्दीत,700 व्या चित्रपटासाठी काम करणे ही आनंदाची गोष्ट आहे.  हा चित्रपट मी पूर्वी केलेल्या कोणत्याही प्रयत्नांपेक्षा वेगळा आहे आणि प्रेक्षक याला कसा प्रतिसाद देतात हे पाहण्यासाठी मी उत्सुक आहे.”
 
 हार्दिक गज्जर लिखित, प्रियदर्शन आणि दीप्ती गोविंदराजन यांची पटकथा असलेला आणि प्रियदर्शन दिग्दर्शित, अप्पथा ही एक अप्रत्याशित बंधनाची सुंदर कथा आहे आणि हा चित्रपट आपल्या पालकांचा आदर करणे आणि स्वतःला शोधण्याची मूल्ये पेरतो.
 
 शांघाय कोऑपरेशन ऑर्गनायझेशन फिल्म फेस्टिव्हल 27 ते 31 जानेवारी, 2023 या कालावधीत मुंबईत, भारत सरकार, माहिती आणि प्रसारण मंत्रालयाद्वारे राष्ट्रीय चित्रपट विकास महामंडळामार्फत, SCO कौन्सिल ऑफ हेड ऑफ स्टेट यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित केला जात आहे. सप्टेंबर 2022 ते सप्टेंबर 2023 या कालावधीत SCO मधील भारताचे अध्यक्षपद चिन्हांकित करण्यासाठी हे आयोजन केले जात आहे.