केतकी चितळेला ‘ ठाणे कोर्टाचा धक्का, अटकपूर्व जामीन अर्ज फेटाळला, जाणून घ्या प्रकरण
फोटो साभार -सोशल मीडिया
अभिनेत्री केतकी चितळे आणि विवाद हे समीकरण आता नवं नाही.अनेकवेळा वादग्रस्त वक्तव्यांमुळे केतकी चर्चेत राहते.तर अनेकवेळा तिच्या सोशल मीडिया पोस्टही (Social media post) विवादीत ठरतात.एपिलिप्सी क्वीन म्हणून प्रसिद्ध असलेली केतकी चितळे पुन्हा एका चर्चेत आली आहे.यावेळी ती केवळ वादग्रस्त विधानांत अडकली नाही तर तिच्यावर गुन्हा (FIR) देखील नोंदवण्यात आला आहे.
मागील वर्षी मार्च महिन्यात हे प्रकरण सुरु झाले. जेव्हा केतकीने एका वादग्रस्त पोस्ट केली होती.तर यासंदर्भात आता ठाणे कोर्टाने तिचा अटकपूर्व जामीन फेटाळला (Pre-arrest bail Rejected) आहे.त्यामुळे केतकीच्या अडचणीत वाढ झाली आहे.सोशल मीडियावर सक्रिय असणारी केतकी नेहमीच वेगवेगळ्या पोस्ट करत असते. अनेकवेळा तिच्यावर टीकाही केली जाते. परंतु ती याकडे लक्ष देत नाही.परंतु केतकीने 1 मार्च 2020 रोजी एक आक्षेपार्ह पोस्ट सोशल मीडियावर पोस्ट केली होती.या पोस्टमुळे तिच्यावर टीका तर झालीच शिवाय गुन्हा ही दाखल झाला.
केतकीने वादग्रस्त पोस्ट केल्यामुळे 3 मार्च 2020 रोजी वकील स्वप्नील जगताप यांनी नवी मुंबई येथील रबाळे पोलीस ठाण्यात केतकी चितळे व सुरज शिंदे ) विरुद्ध जाती व जमाती अत्याचार प्रतिबंद कायद्याअंतर्गत गुन्हा दाखल केला होता.त्यानंतर केतकीने अटकपूर्व जामीनासाठी अर्ज केला होता.परंतु कोर्टाने आता तिचा अटकपूर्व जामीनाचा अर्ज फेटाळला आहे.ठाणे कोर्टाने केतकीला हा मोठ्ठा धक्का दिला आहेत.त्यामुळे तिच्या अडचणीत वाढ होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.