शुक्रवार, 24 जानेवारी 2025
  1. मनोरंजन
  2. मराठी सिनेमा
  3. नाट्य-चित्र गप्पा
Written By
Last Modified: मंगळवार, 31 ऑगस्ट 2021 (19:27 IST)

'देवा गणराया' ने होणार यंदाचा गणेशोत्सव अधिकच चैतन्यमय

लवकरच आपल्या सर्वांच्या लाडक्या बाप्पाचे आगमन होणार असून सगळीकडे उत्साहाचे वातावरण आहे. हाच उत्साह द्विगुणित करण्यासाठी बाप्पाचे 'देवा गणराया' हे गाणे लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. या गाण्याचे टिझर पोस्टर नुकतेच सोशल मिडीयावर प्रदर्शित झाले असून या जल्लोषमय गाण्याला स्वप्नील बांदोडकर याचा आवाज लाभला आहे. या गाण्याच्या चित्रीकरणाचा मुहूर्त सोहळा ठाणे मनपा चे अतिरिक्त आयुक्त संदीप माळवी यांच्या हस्ते पार पडला. सगळीकडे आनंदाचे वातावरण निर्माण करणारे हे गाणे चिन्मय उदगीरकर आणि रूपाली भोसले यांच्यावर चित्रित झाले असून संदीप माळवी यांनीच हे गाणे शब्दबद्ध केले आहे. सुमन एन्टरटेन्मेंट आणि मिडिया प्रा. लि. प्रस्तूत या गाण्याचे संगीत चिनार-महेश यांनी केले असून गाण्याची निर्मिती केदार जोशी यांनी केली आहे.
 
महाराष्ट्रात गणेशोत्सव मोठ्या उत्साहात साजरा केला जातो. या उत्साहवर्धक गाण्यामुळे भक्तांच्या आनंदात भर पडेल तसेच गणेशोत्सवातील वातावरण अधिकच चैतन्यमय होईल ही खात्री आहे. या गाण्याचे दिग्दर्शन आशिष नेवाळकर यांनी केले आहे. संकटसमयीच्या या काळात विघ्नहर्ता गणेशाचे हे गाणे सर्वांमध्ये सकारात्मक उर्जा निर्माण करणारे आहे.