शनिवार, 25 जानेवारी 2025
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: मंगळवार, 31 ऑगस्ट 2021 (17:15 IST)

खेळताना ओढणीचा गळाफास बसून चिमुकलीचा मृत्यू

एका धक्कादायक प्रकरणात घरात खेळत असताना ओढणीचा गळफास बसून आठ वर्षाच्या चिमुकलीचा मृत्यू झाला. उपचारासाठी पिंपरीतील वायसीएम रुग्णालयात दाखल केलं परंतु उपचारापूर्वीच तिचा मृत्यू झाल्याचे डॉक्टरांनी सांगितले.
 
ही घटना रविवारी दुपारी रुपीनगर, तळवडे येथे घडली असून सुमैय्या शफिल शेख असे मृत्यू झालेल्या चिमुरडीचे नाव आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार सुमय्याचे आई-वडील खरेदीसाठी पिंपरी गेले होते. तेव्हा सुमैय्या घरात खेळत होती. मोठ्या बहिणीं देखील दुसर्‍या खोलीत होत्या. तेव्हा सुमैय्या पडद्याचा झोपाळा करुन खेळताना ओढणीचा गळफास बसला. ही बाब बहिणींच्या लक्षात आली आणि तिला पिंपरीतील रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र तिचा मृत्यू झाला. ही चार बहिणींमध्ये सर्वात लहान होती.