सोमवार, 27 जानेवारी 2025
  1. मनोरंजन
  2. मराठी सिनेमा
  3. नाट्य-चित्र गप्पा
Written By

अगडबम नाजुकाचा थरारक ट्रेलर लाँच

अगडबम नाजुकाच्या थरारक करामती मांडणाऱ्या 'माझा अगडबम' या आगामी सिनेमाचा नुकताच सोशल नेट्वर्किंग साईटवर नवीन ट्रेलर लाँच करण्यात आला. सुपरहिट 'अगडबम' चा दमदार सिक्वेल असलेला हा सिनेमा येत्या २६ ऑक्टोबर रोजी प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. 'पेन इंडिया कंपनी'चे जयंतीलाल गडा आणि तृप्ती भोईर फिल्म्स यांची प्रस्तुती असलेल्या या सिनेमाचा ट्रेलर प्रेक्षकांचे भरघोस मनोरंजन करीत आहे. साधी सरळ आणि सोज्वळ अश्या सामान्य गृहिणीच्या भूमिकेत असलेली नाजुका आणि तिचा प्रेमळ नवरा रायबाची रंजक गोष्ट या ट्रेलरमध्ये आपल्याला पाहायला मिळते. इतकेच नव्हे तर, खराखुरा सुमो आणि डब्ल्यूडब्ल्यूईचे रेसलरदेखील यात आपल्याला दिसून येत असून, मावळ्यासारखा पेहराव घातलेला एक नकापधारी पेहलवानदेखील यात आपल्याला पाहायला मिळतो. अगडबम नाजुकासारखीच शरीरयष्टी असलेल्या या पेहलवानाची उकल मात्र या ट्रेलरमध्ये होत नसल्याकारणामुळे, प्रेक्षकांसाठी तो कुतूहलाचा विषय ठरत आहे. 
'माझा अगडबम' सिनेमाच्या या ट्रेलरमध्ये नाजुकाच्या प्रमुख भूमिकेत असलेल्या तृप्ती भोईरचा अंदाज प्रेक्षकांचा उर दडपून टाकतो. शिवाय, रायबाच्या भूमिकेत असलेल्या सुबोध भावेसोबतचा तिचा रोमान्सदेखील प्रेक्षकांचे भरपेट मनोरंजन करीत आहे. तृप्तीने या सिनेमात अभिनयाबरोबरच लेखक आणि सिनेदिग्दर्शनाची धुरादेखील सांभाळली आहे. शिवाय, निर्मात्यांच्या फळीत  टी. सतीश चक्रवर्ती, धवल जयंतीलाल गडा, अक्षय जयंतीलाल गडा आणि तृप्ती भोईरचा समावेश आहे. तसेच रेश्मा कडाकिया, कुशल कांतीलाल गडा आणि नीरज गाला यांनी या सिनेमाच्या सहनिर्मात्यांची धुरा सांभाळली आहे.