मंगळवार, 24 डिसेंबर 2024
  1. मनोरंजन
  2. मराठी सिनेमा
  3. नाट्य-चित्र गप्पा
Written By
Last Updated : मंगळवार, 17 ऑक्टोबर 2017 (16:24 IST)

माधुरी आता मराठीत, असा राहणार आहे धक् धक् गर्लचा नवीन अवतार

लाखो चाहत्यांची धकधक गर्ल माधुरी दीक्षित अखेर मराठी चित्रपटांमध्ये दिसणार आहे. हिंदी चित्रपटसृष्टी गाजवल्यानंतर माधुरी लवकरच मराठी पडद्यावर झळकणार आहे. ब्लू मस्टँग क्रिएशन्स आणि दार मोशन पिक्चर्स यांची निर्मिती असलेल्या आगामी मराठी चित्रपटात माधुरी प्रमुख भूमिकेत दिसणार आहे. तेजस देऊस्कर याच्याकडे दिग्दर्शनाची जबाबदारी सोपवण्यात आली असून दिवाळीनंतर चित्रपटाच्या चित्रीकरणाला सुरुवात होईल, अशी माहित आहे.
 
या सिनेमाचे नाव अद्याप जाहीर केलेलं नाही. “मराठी ही माझी मायभूमी आहे. या सिनेमातील भूमिका मला मराठीशी एकरुप होण्याची संधी देईल,” अशी प्रतिक्रिया माधुरी दीक्षितने व्यक्त केली आहे. याआधी मराठी चित्रपटाची निर्मिती करणार असल्याची घोषणा माधुरीने केली होती. हा सिनेमा स्वप्निल जयकर दिग्दर्शित करणार असून तो 2018 मध्ये प्रदर्शित होण्याची शक्यता आहे.