शनिवार, 28 डिसेंबर 2024
  1. मनोरंजन
  2. मराठी सिनेमा
  3. नाट्य-चित्र गप्पा
Written By
Last Modified: मंगळवार, 25 मे 2021 (19:52 IST)

सोनाली कुलकर्णीच्या वडिलांवर हल्ला, आत्ताच पार पडला सोनालीचा विवाह सोहळा

फोटो: इंस्टाग्राम@sonalee18588
प्रसिद्ध अभिनेत्री सोनाली कुलकर्णी (Actress Sonalee Kulkarni) हिच्या वडिलांवर चाकूहल्ला झाल्याची घटना घडली आहे. (मंगळवारी, दि.25) सकाळी साडे सातच्या सुमारास निगडी प्राधिकरण याठिकाणी सोनाली कुलकर्णी हिच्या ‘वरलक्ष्मी’ या राहत्या घरी ही घटना घडली. या हल्ल्यात जखमी झालेल्या सोनाली कुलकर्णी हिच्या वडिलांच्या हाताला टाके पडले आहेत.
 
सोनाली कुलकर्णीच्या वडिलांचे पुण्यातील निगडी प्राधिकरण भागातील सेक्टर क्रमांक २५ येथील घरात आरोपी अजय शेगटे सकाळी अचानक दारात आला. सोनालीच्या वडिलांनी अजयला रोखण्याचा प्रयत्न केला मात्र माथेफिरु अजयने त्यांच्यावर चाकूने हल्ला केला. यावेळी झालेल्या झटापटीत ६३ वर्षीय मनोहर कुलकर्णी जखमी झाल्याची माहिती आहे. मनोहर कुलकर्णी हे सैन्यदलातून निवृत्त झालेले डॉक्टर आहेत. दरम्यान या प्रकरणी एका २४ वर्षीय अजय शेगटे नावाच्या व्यक्तीला पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. अजय आपण सोनाली कुलकर्णीचा फॅन असल्याचे सांगतो. 
 
अभिनेत्री सोनाली कुलकर्णीने ७ मे रोजी दुबईमध्ये कुणाल बेनोडेकर याच्याशी लग्नगाठ बांधली. सोनाली कुलकर्णी आणि कुणाल बेनोडेकरचा फेब्रुवारी 2020 मध्ये साखरपुडा पार पडला होता. सोनालीने तिच्या लग्नसोहळ्याचे फोटो पोस्ट करत चाहत्यांना आनंदाची बातमी दिली होती. सध्याची परिस्थिती बघता दुबईतील एका मंदिरात अत्यंत साध्या पद्धतीने हा लग्नसोहळा पार पडला. 
 
सोनालीने चाहत्यांना सोशल मीडियावर आपल्या भावना व्यक्त करत सांगितले होते की आम्ही जून मध्ये ukला लग्न करणार होतो कारण त्याची पूर्ण family&friends तिथे असतात. पण तिथल्या 2ndwave मुळे तारीख पुढे करावी लागली. जुलै मधली तारीख ठरली. लग्नाच्या तयारीसाठी मी मार्च मध्ये shooting संपवून दुबईला आले,आणि भारतात 2ndwave आली Not just मी पुन्हा एकदा दुबईत अडकले पण.. लग्न बंधनात ही!
April मध्ये UK ने Indians साठी travel ban जाहीर केला. July पर्यंत परिस्थिती बदलणार नाही, Quarantine, travel restrictions, family साठी risk,एकंदरीत होणारा अनावश्यक खर्च,सरकार चे नियम, याचा विचार करता आम्ही आमचा भला मोठा लग्न समारंभ cancel करायचा निर्णय घेतला. June चं July होतंय, म्हणलं postpone करायच्या एैवजी July चं May मध्ये prepone करून सगळ्यांनाच सुखद धक्का देऊ. आम्ही आता एकत्र एका देशात आहोत, पुढे कधी काय होईल माहीत नाही. जगभरातली परिस्थिती पाहता आता एकमेकांची तब्येत जपून ‘लग्न’ जास्त महत्वाचं आहे ना की ‘समारंभ’.
 
आपल्या देशात अशी परिस्थिती असताना आम्ही कुठलंही celebration करूच शकत नाही तो खर्च वाचवून कोणाला मदत करता यावी या सारखं भाग्य नाही. आई-बाबांचा होकार घेऊन लगेच तयारीला लागलो. माझं कुटुंब भारतात,कुणाल चं लंडनला,कधी पुन्हा सगळे एकत्र येतील माहीत नाही. आता Registration करून टाकू. 
२ दिवसात सगळं ठरवलं.एका तासात खरेदी, १५ मिनी. मध्ये ४ लोकांच्या साक्षीने मंदीरात कायदेशीर विवाह केला (इथे Covid restrictions मुळे तेवढंच शक्य आहे) वरमाळ, मंगळसूत्र, कुंकू (लग्नाच्या मान्यतेसाठी मंदीराकडून प्रमाणपत्र मिळवण्यासाठी आवश्यक असणाऱ्या विधी) करून Marriage Certificate वर sign केलं.