अभिनेत्री सोनाली कुलकर्णी हिच्या वडिलांवर चोराचा चाकू हल्ला

sonali
Last Modified मंगळवार, 25 मे 2021 (19:05 IST)
चोरीच्या उद्देशाने आलेल्या चोराने अभिनेत्री सोनाली कुलकर्णी हिच्या वडिलांवर चाकूने हल्ला केला आहे. आज (मंगळवारी, दि.25) सकाळी साडे सातच्या सुमारास निगडी प्राधिकरण याठिकाणी सोनाली कुलकर्णी हिच्या ‘वरलक्ष्मी’ या राहत्या घरी ही घटना घडली. या हल्ल्यात जखमी झालेल्या सोनाली कुलकर्णी हिच्या वडिलांच्या हाताला टाके पडले आहेत.
‘वरलक्ष्मी’ या बिल्डिंगच्या सुरक्षा रक्षकाने दिलेल्या माहितीनुसार, सकाळी एक चोरटा चाकू, प्लास्टिकची पिस्तुल घेऊन इमारतीच्या आत घुसला. त्यानंतर समोर आलेल्या एका महिलेवर त्याने स्प्रे मारला. त्यानंतर हा चोरटा दुसऱ्या मजल्यावर गेला याठिकाणी सोनाली कुलकर्णी यांचे कुटुंबीय राहतात. सोनाली कुलकर्णीचे वडील व चोर यांच्यात धरपकड झाली. यावेळी चोराने त्यांच्यावर धारधार चाकूने हल्ला केला. या हल्ल्यात त्यांच्या हताला गंभीर जखम झाली.
सुरक्षा रक्षकाने तात्काळ शिवसेनेचे स्थानिक नगरसेवक अमित गावडे यांना फोन करून घडलेली हकीकत सांगितली. नगरसेवक अमित गावडे यांनी पोलिसांना घेऊन घटनास्थळी धाव घेतली व पोलिसांनी चोरट्याला ताब्यात घेतले.

निगडी पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पकडण्यात आलेल्या चोरट्याचे शेट्टी असे नाव आहे. आपल्या मागे पोलीस लागले होते म्हणून घाबरून पळत होतो असे त्या चोरट्याने पोलिसांना सांगितले.


यावर अधिक वाचा :

अयोध्या विशेष : राम जन्मस्थळ अयोध्यांचे 10 मुख्य प्रेक्षणीय ...

अयोध्या विशेष : राम जन्मस्थळ अयोध्यांचे 10 मुख्य प्रेक्षणीय स्थळ...
सप्तपुरींपैकी एक असलेली अयोध्या हिंदू, जैन, बौद्ध आणि शीख समुदायासाठी एक महत्त्वाचे ...

कुणकेश्वरचा इतिहास

कुणकेश्वरचा इतिहास
देवगडच्या दक्षिणेस 20 कि. मी. वर असलेले श्री क्षेत्र कुणकेश्वर निसर्गरम्य सौंदर्यस्थळ आणि ...

सफर निसर्गरम्य बूंदीची

सफर निसर्गरम्य बूंदीची
भटकंतीच्या दृष्टीने राजस्थानचं विशेष महत्त्व राहिलं आहे. राजस्थानमध्ये गेल्यावर जयपूर, ...

पलरुवी अर्थात दुधाचा धबधबा

पलरुवी अर्थात  दुधाचा धबधबा
केरळमधील सगळ्यात सुंदर धबधब्यांपैकी एक आहे, जो 300 फूट उंचावरून खाली येतो. दक्षिण ...

रामेश्वरम्: एक प्रसिद्ध तीर्थक्षेत्र

रामेश्वरम्: एक प्रसिद्ध तीर्थक्षेत्र
रामेश्वरम्, भारताच्या दक्षिण दिशेस बंगालच्या उपसागराच्या किनाऱ्यावर असणारे एक शहर. या ...

तीर्थक्षेत्र दत्त शिखर माहूरगड

तीर्थक्षेत्र दत्त शिखर माहूरगड
हे क्षेत्र श्री सद्गुरू दत्तात्रेयांचे जागृत स्थान म्हटले जाते. माहूरगड हे रेणुका मातेचे ...

डॉ. बाबासाहेब आंबेडकर : द अनटोल्ड ट्रुथ’ चित्रपटाचे ६ ...

डॉ. बाबासाहेब आंबेडकर : द अनटोल्ड ट्रुथ’ चित्रपटाचे ६ डिसेंबर रोजी दूरदर्शनच्या सह्याद्री वाहिनीवरून प्रसारण
भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाणदिनी, सोमवार, दि.६ डिसेंबर २०२१ रोजी ...

किल्ल्यांचे शहर असलेल्या ग्वाल्हेरच्या प्रेक्षणीय स्थळ सासू ...

किल्ल्यांचे शहर असलेल्या ग्वाल्हेरच्या प्रेक्षणीय स्थळ सासू सुनाच्या मंदिरा बद्दल जाणून घ्या
मध्य प्रदेशच्या उत्तरेस स्थित असलेल्या ग्वाल्हेर शहरामध्ये स्वतःच इतिहासाच्या अनेक ...

बाळूमामा आणि काळूबाईसारख्या धार्मिक-अध्यात्मिक मालिकांचा ...

बाळूमामा आणि काळूबाईसारख्या धार्मिक-अध्यात्मिक मालिकांचा ट्रेंड का वाढतोय?
'अगडदुम नगारा, सोन्याची जेजुरी....बोल अहंकारा, सदानंदाचा येळकोट' हे गाणं ऐकू आलं की, ...

मराठी जोक : एवढ्या मार्कात दोन पोर पास झाली असती

मराठी जोक : एवढ्या मार्कात दोन पोर पास झाली असती
रमा रडत असते झम्प्या : काय झाल ,रमा का रडतेस ?