रविवार, 29 डिसेंबर 2024
  1. मराठी ज्योतिष
  2. ग्रहमान
  3. ग्रह-नक्षत्रे
Written By
Last Modified: शनिवार, 22 मे 2021 (15:23 IST)

Chandra Grahan 2021 चंद्र ग्रहण ही कामे करणे वर्जित

2021 चे पहिले चंद्रग्रहण 26 मे रोजी होईल. भारतीय वेळेनुसार दुपारी 2 वाजून 17 मिनिटावर याची सुरुवात होईल आणि संध्याकाळी 7 वाजून 19 मिनिटापर्यंत राहील. ग्रहण प्रथम ग्रहण 14:18 वाजता सुरू होईल आणि पूर्ण ग्रहण 16:43 वाजता सुरू होईल. चंद्रग्रहण जास्तीत जास्त 16:48 असेल आणि ग्रहण 16:54 वाजता समाप्त होईल. चंद्रग्रहणाचा एकूण कालावधी: 5 तास 2 मिनिटे.
 
चंद्रग्रहणाचा सुतक कालावधी
चंद्रग्रहणापूर्वी 9 तास आधी सुतक कालावधी सुरू होतो. तथापि, 26 मे रोजी होणाऱ्या ग्रहणात सुतक कालावधी वैध ठरणार नाही.

चंद्र ग्रहण ही कामे करणे वर्जित
जेव्हा पृथ्वी ही सूर्य व चंद्राच्या मध्ये येते, तेव्हा पृथ्वीची सावली चंद्रावर पडल्याने चंद्रग्रहण दिसते. चंद्रग्रहण ही एक पूर्णत: वैज्ञानिक खगोलीय घटना आहे. चंद्रग्रहण साधारणपणे पौर्णिमेच्या आसपास दिसते. सूर्य, पृथ्वी आणि चंद्र एका रेषेत आणि एका प्रतलात आल्यावर चंद्रग्रहण होते.
 
चंद्रग्रहण दरम्यान काय करू नये
प्रत्यक्ष ग्रहणावेळी कोणत्याही प्रकारचे शुभ कार्य करण्यास मनाई आहे.
 
चंद्र ग्रहण दरम्यान देवांच्या मूर्तीला हात लावू नये. या दरम्यान सूतक असल्यामुळे मंदिराचं दारं बंद ठेवावं.
 
ग्रहणावेळी भोजन शिजवू नये अर्थात स्वयंपाक करु नये. अशाने ग्रहांच्या परिवर्तन तसंच आरोग्यावर वाईट परिणाम होतो.
 
ग्रहण दरम्यान वादविवाद टाळण्यासाठी असे म्हटले जाते की या काळात पती-पत्नीने संयम ठेवला पाहिजे.
 
या दरम्यान गर्भवती स्त्रियांनी सर्वात अधिक काळजी घेतली पाहिजे. ग्रहणाचा विपरित प्रभाव गर्भातील शिशुवर होऊ शकतो म्हणून अशात गर्भवती स्त्रियांनी स्वत:जवळ एक नारळ ठेवावं.
 
ग्रहणात डोक्यावर तेल लावणे, भोजन तयार करणे किंवा सेवन करणे वर्जित असतं. या दरम्यान खाद्य पदार्थ पूर्णपणे विषारी होऊन जातात.
 
ग्रहण दरम्यान कुठलेही शुभ किंवा नवीन काम सुरू करणे टाळावे.