रविवार, 29 डिसेंबर 2024
  1. मराठी ज्योतिष
  2. ग्रहमान
  3. ग्रह-नक्षत्रे
Written By
Last Modified: सोमवार, 28 डिसेंबर 2020 (09:04 IST)

वर्ष 2021 मधील भारतात ग्रहण कधी लागणार जाणून घ्या

हिंदू परंपरेत ग्रहणाला महत्त्व आहे. आपल्या सर्वांना माहिती आहे की ग्रहण दोन प्रकारचे असतात - सूर्य ग्रहण आणि चंद्र ग्रहण. सूर्य ग्रहण आणि चंद्र ग्रहण देखील दोन प्रकारचे असतात - खग्रास आणि खंडग्रास. जेव्हा ग्रहण पूर्णपणे दृश्यमान होते तेव्हा 'खग्रास' आणि जेव्हा ग्रहण काही प्रमाणात दृश्यमान होते तेव्हा त्याला 'खंडग्रास' असे म्हणतात आणि ग्रहण अजिबात दिसत नाही तर त्याला 'मांद्य ग्रहण' असे म्हणतात. 
 
खग्रास आणि खंडग्रास ग्रहणाचे सर्व बारा राशींवर व्यापक परिणाम होते. परंतु मांद्य ग्रहणाचा जनतेवर काहीच परिणाम होत नाही. जेव्हा राहत्या ठिकाणी ग्रहण दिसत नाही तेव्हा ग्रहणाचे यम-नियम इत्यादी तिथल्या रहिवाश्यांवर प्रभावी होत नाही. चला जाणून घ्या की येणाऱ्या नवीन वर्षात 2021 मध्ये कोणते ग्रहण कधी आहे.
 
1 खग्रास चंद्रग्रहण - येत्या वर्षाचे 2021 चे पहिले ग्रहण 26 मे 2021 संवत 2078 रोजी वैशाख शुक्ल पौर्णिमेचा दिवशी बुधवारी आहे. हे ग्रहण खग्रास चंद्रग्रहण आहे. हे ग्रहण भारतात दिसणार नाही. भारतात हे ग्रहण दृश्यमान नसल्याने या ग्रहणाचे यम-नियम सूतक इत्यादी भारतीयांवर लागू पडणार नाही.
  
2 कंकणाकृती सूर्यग्रहण - वर्ष 2021 चे दुसरे ग्रहण 'कंकणाकृती सूर्यग्रहण' आहे. जे 10 जून 2021 संवत 2078 रोजी वैशाख कृष्ण अमावस्याच्या दिवशी गुरुवारी लागेल. हे ग्रहण देखील भारतात दिसणार नाही. भारतात दिसत नसल्यामुळे या ग्रहणाचे यम नियम आणि सूतक भारतीयांवर लागू पडणार नाही.
 
3 खंडग्रास चंद्रग्रहण - येत्या वर्षात 2021 मध्ये 'खंडग्रास चंद्रग्रहण' 19 नोव्हेंबर 2021 संवत 2078 कार्तिक शुक्ल पौर्णिमेला शुक्रवारी आहे. हे ग्रहण भारतात दिसणार नाही. त्यामुळे याचे यम नियम आणि सूतक भारतीयांवर लागू होणार नाही.
 
4 खग्रास सूर्य ग्रहण - 
येत्या वर्षाचे 2021 चे शेवटचे ग्रहण 'खग्रास सूर्य ग्रहण' आहे जे 4 डिसेंबर 2021 संवत 2078 रोजी कार्तिक महिन्यातील कार्तिक कृष्णपक्षाच्या अमावास्येला शनिवारी आहे. हे ग्रहण भारतात दिसणार नाही. भारतात दिसणार नसल्यामुळे या ग्रहणाचे यम-नियम आणि सूतक लागू होणार नाही.
 
वरील शास्त्रीय वर्णनानुसार येत्या वर्षात 2021 मध्ये एकूण 4 ग्रहण होतील जे भारतातील काही भाग वगळता इतर सर्व ठिकाणी दिसणार नाही. ज्या ठिकाणी ग्रहण दिसणार नाही त्या ठिकाणी ग्रहणाचे यम-नियम सूतक इत्यादी तिथल्या रहिवाश्यांना लागू होणार नाही.
 
-ज्योतिर्विद् पं. हेमन्त रिछारिया 
प्रारब्ध ज्योतिष परामर्श केंद्र
संपर्क: [email protected]