शुक्रवार, 8 नोव्हेंबर 2024
  1. मराठी ज्योतिष
  2. ग्रहमान
  3. ग्रह-नक्षत्रे
Written By

Chandra Grahan 2020 : वर्षाचे शेवटचे चंद्रग्रहण या राशीमध्ये, जाणून घ्या प्रभाव

30 नोव्हेंबरला लागणाऱ्या उपछाया चंद्रग्रहणात कोणतेही प्रकाराचे सुतक या कालावधीत ग्राह्य धरले जाणार नाही. या वर्षाचे शेवटचे ग्रहण 30 नोव्हेंबर रोजी आहे. हे चंद्रग्रहण उपछाया चंद्रग्रहण असणार. 
 
ज्योतिषशास्त्राच्या आणि विज्ञानाच्या दृष्टीकोनातून ग्रहण फार महत्त्वाचे मानले जाते. वैज्ञानिक दृष्टीकोनातून ग्रहण ही एक खगोलीय घटना आहे, तर ज्योतिषशास्त्र सांगतं की ज्यावेळी ग्रहण होत त्यावेळी त्याचा खोल परिणाम मानवी जीवनावर होतो. या वर्षीचे 2020 चे शेवटचे ग्रहण 30 नोव्हेंबर रोजी होणार आहे. हे ग्रहण चंद्रग्रहण असून उपछाया ग्रहण असणार. 
 
ज्योतिषीय गणनेनुसार हे उपछाया चंद्र ग्रहण वृषभ राशीत आणि रोहिणी नक्षत्रात लागणार आहे. वृषभ राशीमध्ये हे चंद्रग्रहण असल्यामुळे याचा परिणाम वृषभ राशीच्या लोकांवर दिसून येईल. 
 
उपछाया चंद्रग्रहण म्हणजे काय -
पूर्ण आणि आंशिक ग्रहणाच्या व्यतिरिक्त एक उपछाया ग्रहण देखील असत. उपछाया चंद्रग्रहण अशी स्थिती आहे जेव्हा चंद्रमावर पृथ्वीची सावली पडत नसून त्याची उपछाया पडते. या मुळे चंद्रमा धुक्याच्या सावलीत दिसतो. या घटनेमुळे पृथ्वीच्या उपछाया मध्ये गेल्यावर चंद्रमावर धुकं असं वाटतं. कोणतेही चंद्रग्रहण सुरू होण्यापूर्वी चंद्रमा पृथ्वीच्या सावलीत प्रवेश करतो. ज्यामुळे त्याची छवी मंदावते. चंद्राचा प्रभाव कमी होतो. याला उपछाया असे ही म्हणतात. या दिवशी चंद्र पृथ्वीच्या वास्तविक कक्षात प्रवेश करणार नाही म्हणून याला ग्रहण म्हटले जाणार नाही.
 
उपछाया चंद्रग्रहणाचे परिणाम - 
30 नोव्हेंबर रोजी लागणाऱ्या उपछाया चंद्रग्रहणात कोणतेही सुतक काळ वैध ठरणार नाही. म्हणून ग्रहणाशी संबंधित कोणतेही परिणाम पडणार नाही. ज्योतिष शास्त्रानुसार चंद्रग्रहणाचा वेळी त्यांचा परिणाम लोकांचा मनावर पडतो. ग्रहण लागल्यास चंद्र पीडित होऊन अशुभ परिणाम बघायला मिळतात. वर्षाचे शेवटचे ग्रहण वृषभ राशीत लागणार आहे. म्हणून या वृषभ राशीच्या लोकांनी काळजी घेणं आवश्यक आहे.