आपणास चंद्रग्रहण असल्यास बघावयाचे असल्यास या गोष्टी जाणून घ्या
चंद्रग्रहण आणि सूर्यग्रहण दोन्ही प्रत्येक वर्षी घडणाऱ्या खगोलीय घटना आहेत. याना उघड्या डोळ्यांनी बघणे हानिकारक मानले जाते. उघड्या डोळ्यांनी ग्रहण बघितल्याने डोळ्यांच्या दृष्टीवर याचे दुष्प्रभाव पडते. डोळ्याची दृष्टी अंधुक होऊ शकते. तज्ज्ञांच्यामते, सूर्यग्रहणाच्या उघड्या डोळ्यांनी बघणं हानिकारक असतं चंद्रग्रहणाला नाही.
तरी सूर्यग्रहणाप्रमाणे चंद्रग्रहण बघावयास आपल्याला विशेष दक्षता घ्यावयाची गरज नसते. आपण एका विशेष सौर फिल्टरसह चष्म्याने किंवा त्याचा शिवाय देखील चंद्र ग्रहण सहजरीत्या बघू शकता.
आपण आपल्या घराच्या छतावर उभे राहून किंवा खुल्या मैदानात किंवा बगीच्यामध्ये डोळे वर करून देखील थेट चंद्र ग्रहण बघू शकता.
चंद्रग्रहण बघण्यासाठी आपल्याला आपल्या डोळ्यांची काळजी करण्याची गरज नसावी. चंद्राचा प्रकाश आपल्या डोळ्यांवर काहीही दुष्प्रभाव टाकू शकत नाही. त्यामुळे आपण चष्म्याशिवाय देखील बघू शकता.
चंद्रापेक्षा सूर्याचा प्रकाश प्रखर असतो. जे डोळ्यांसाठी हानिकारक आहे. सूर्यग्रहणाच्या वेळी सौर विकिरण(सोलर रेडिएशन) मुळे डोळ्यांचे नाजूक ऊतींचे नुकसान होते. ज्यामुळे डोळ्यांचा पडद्यावर त्याचा नकारात्मक प्रभाव पडतो. पण चंद्रग्रहणाच्या वेळी सौर विकिरणाचा कोणताही धोका नसतो. किंवा डोळ्यांनाही त्याचा परिणाम होत नाही. हेच कारण आहे की चंद्र ग्रहण उघड्या डोळ्याने बघता येते.
पण आपण ज्योतिषशास्त्र आणि धर्मामध्ये विश्वास करीत असल्यास चंद्रग्रहण बघणे टाळा. चंद्रग्रहण हृदय, मेंदू आणि मनावर प्रभाव टाकतो. ज्याप्रमाणे समुद्राची भरती ओहोटी चंद्राला प्रभावित करते त्याच प्रमाणे भावनांच्या भरतीवर देखील त्याचा परिणाम होतो.
* चंद्रग्रहण बघितल्यावर किंवा चंद्रग्रहणाच्या दरम्यान आपण चिंताग्रस्त, विचलित किंवा रागीट होऊ शकता.
* चंद्रग्रहण बघून डोक्यात जडपणा येऊ शकतो.
* मानसिक आजाराने ग्रस्त असलेल्या व्यक्तीला चंद्रग्रहणापासून दूर ठेवले जाते.
* आपण खूप भावुक असल्यास चंद्रग्रहण बघून आपल्या भावनांमध्ये चढ उतार येऊ शकतात.
* जर का चंद्रग्रहण आपल्या राशीसाठी अशुभ सांगितले असेल तर आधुनिक होण्याचा नादात ग्रहण बघण्याचा प्रयत्न करू नका.