चंद्र ग्रहण: गर्भवती स्त्रियांनी घ्यावी काळजी, हे कार्य टाळावे
हिंदू धर्मानुसार ग्रहणाचे प्रत्येकावर चांगले किंवा वाईट परिणाम दिसून येतात. ज्यापासून बचावासाठी काही नियम सांगितले गेले आहे. गर्भवती स्त्रियांनी विशेष काळजी घ्यावी-
टोकदार वस्तू
ग्रहण दरम्यान गर्भवती स्त्रियांनी टोकदार वस्तू जसे चाकू, कातरी, सुई इतर वस्तू वापरु नये.
बाहेर जाणे टाळावे
ग्रहण असताना गर्भवती स्त्रियांनी घरातून बाहेर जाणे टाळावे. याचा प्रभाव गर्भस्थ शिशूच्या मानसिक आणि शारीरिक आरोग्यावर पडू शकतो.
ग्रहण दरम्यान शिजवलेलं अन्न खाणे टाळावे
या दरम्यान तयार केलेले भोजन करणे टाळावे. या दरम्यान पसरणार्या हानिकारक किरणांमुळे अन्न दूर्षित होतं. काही पदार्थांमध्ये तुळशीचे पान टाकून ठेवावे. जे ग्रहणानंतर सेवन करता येऊ शकतात.
ग्रहणानंतर अंघोळ
ग्रहण संपल्यावर अंघोळ करावी याने गर्भस्थ शिशूला त्वचेच्या आजाराला सामोरा जावं लागत नाही.
संबंध नको
ग्रहण काळात दंपीने शारीरिक संबंध ठेवू नये.
धार्मिक कार्य
या दरम्यान गर्भवती स्त्रीने तुळशीचे पान जीभेवर ठेवून हनुमान चालीसा आणि दुर्गा स्तुती पाठ करावा. या व्यतिरिक्त ग्रहण दरम्यान झोपणे, औषधांचे सेवन करणे आणि देवाच्या मुरत्यांना स्पर्श करणे टाळावे.