1. मराठी ज्योतिष
  2. ग्रहमान
  3. ग्रहण
Written By
Last Modified: मंगळवार, 8 डिसेंबर 2020 (13:46 IST)

सूर्य ग्रहण 2020 : सोमवती अमावास्येला सूर्यग्रहण, काय करावे- काय नाही

14 डिसेंबर रोजी या वर्षाचे दूसरे आणि शेवटचे सूर्य ग्रहण आहे. ज्योतिषशास्त्रीय गणनेनुसार, हे सूर्यग्रहण कार्तिक महिन्याच्या सोमवती अमावास्येला वृश्चिक राशी आणि ज्येष्ठा नक्षत्रामध्ये लागत आहे. हे सूर्यग्रहण भारतात दिसणार नसून इथे सूतकाची कालावधी वेध नसेल.
 
सूर्य ग्रहणाची तारीख आणि वेळ -
सूर्य ग्रहण भारतीय वेळेनुसार 14 डिसेंबर रोजी संध्याकाळी 7 वाजून 3 मिनिटा पासून सुरू होऊन 15 डिसेंबर रात्री 12 वाजून 23 मिनिटा वर संपेल. ज्योतिष आणि धार्मिक दृष्ट्या ग्रहण होणं ही अशुभ कालावधी आहे म्हणून या काळात बऱ्याच गोष्टी करणे वर्ज्य मानले जाते. चला तर मग जाणून घेऊ या की ग्रहणाच्या काळात काय करावे आणि काय नाही.
 
ग्रहणाच्या काळात ही खबरदारी घ्या -
 
* ग्रहणाच्या काळात आणि ग्रहण संपेपर्यंत देवाच्या मूर्तीना स्पर्श करू नये.
* ग्रहणकाळात घराच्या देवघराचे कपाट बंद करून द्यावे. जेणे करून देवांवर ग्रहणाचा परिणाम होणार नाही.
* ग्रहण काळात गरोदर बायकांनी ग्रहण बघू नये आणि घराच्या बाहेर देखील पडू नये.
* ग्रहण काळात स्त्री-पुरुषांनी शारीरिक संबंध बनवू नये.
* या काळात शारीरिक संबंध बनविल्याने गरोदरपण्यात मुलावर वाईट परिणाम होतो.
* सूतक लागल्या वेळी आणि ग्रहणाच्या दरम्यान सर्वात जास्त नकारात्मक शक्ती वर्चस्व गाजवतात. ग्रहण काळात श्मशानाजवळ जाऊ नये.
* सुतकाचे वेध लागल्यावर कोणतेही शुभ कार्य करणे टाळावे. या काळात केलेले कोणतेही कार्य शुभ आणि यशस्वी होत नाही.
* ग्रहण काळाच्या वेळी नखे आणि केस कापू नये. या शिवाय काहीही खाऊ नये आणि बनवू देखील नये.
 
ग्रहणानंतर ही कामे करावी -
* सूर्य ग्रहणाच्या वेळी, सूर्याशी संबंधित मंत्राचे जप करावे.
* ग्रहण संपल्यावर स्नान करून नवीन कपडे घालून दान करावं.
* या नंतर कोणतेही काम करावे.
* ग्रहण संपल्यावर संपूर्ण घरात गंगा जल शिंपडून घराची शुद्धी करावी.
* ग्रहण संपल्यावर घराच्या जवळ असलेल्या देऊळात पूजा करून दान करा.
* असे ही मानले जाते की ग्रहण संपल्यावर गायीला पोळी खाऊ घालावी.
* आई लक्ष्मीची कृपा मिळविण्यासाठी ग्रहण संपल्यावर इंद्रदेवाची पूजा करण्याचे विधान देखील आहे.