गुरूवार, 7 नोव्हेंबर 2024
  1. मराठी ज्योतिष
  2. ग्रहमान
  3. ग्रहण
Written By
Last Modified: सोमवार, 14 डिसेंबर 2020 (08:37 IST)

सूर्य ग्रहण 2020 : 14 डिसेंबर रोजी पडणाऱ्या सूर्य ग्रहणाची वेळ आणि महत्त्व जाणून घ्या

या वर्षीचे शेवटचे सूर्य ग्रहण 14 डिसेंबर 2020,सोमवार रोजी पडत आहे. या दिवशी अमावस्या देखील आहे.या दिवशी भारतामध्ये रात्रीला हे ग्रहण लागणार आहे. ज्योतिषशास्त्रात ह्याला खंडग्रास ग्रहण देखील म्हटले जाते. 
 
खंडग्रास सूर्यग्रहण म्हणजे काय ?
जेव्हा सूर्य आणि पृथ्वीच्या मध्ये चंद्रमा येतो तेव्हा या स्थितीला सूर्यग्रहण म्हणतात. पण चंद्रमा सूर्याचा काहीच भाग झाकतो तर ह्याला खंडग्रास सूर्यग्रहण असे म्हणतात. म्हणजे 14 डिसेंबर 2020 रोजी होणारे हे सूर्य ग्रहण खंडग्रास सूर्य ग्रहण आहे. 
 
सूर्य ग्रहणाची वेळ - 
भारतीय वेळेनुसार 14 डिसेंबर रोजी संध्याकाळी 7 वाजून 3 मिनिटा पासून सुरू होऊन रात्री 12 वाजून 23 मिनिटावर संपेल. हे ग्रहणकाळ सुमारे 5 तासापेक्षा जास्त काळ राहील.
 
खंडग्रास सूर्य ग्रहणाचा प्रभाव आणि महत्त्व - 
जरी  ग्रहण ही एक सामान्य खगोलशास्त्रीय घटना आहे ह्याचा मानवी जीवनासाठी फारसा महत्त्व नसतो पण ज्योतिषशास्त्रामध्ये आणि ज्योतिषीय गणनेमध्ये हे खूप महत्त्वपूर्ण आहे. ग्रहणाचा प्रभाव लोकांच्या राशीवर आणि त्यांच्या भविष्यावर पडतो. पण यंदाचे हे ग्रहण भारतात दिसणार नाही त्यामुळे ह्याचा काहीच परिणाम होणार नाही. भारतात हे सूर्यग्रहण रात्री लागत असल्यामुळे ह्याचे सुतक देखील लागणार नाही आणि त्यासाठी कोणतीही खबरदारी घ्यावयाची गरज नाही. जर इथे ग्रहण दिसले असते तर गरोदर बायकांना खबरदारी घ्यावी लागली असती परंतु या वेळी कोणतीही खबरदारी घ्यावयाची गरज नाही कारण ह्याचा काहीही परिणाम होणार नाही.
 
ग्रहण इथे दिसेल -
14 डिसेंबर 2020 रोजी पडणारे हे ग्रहण दक्षिण आफ्रिका,दक्षिण अमेरिका आणि प्रशांत महासागरातील काही भागात दिसणार आहे.
 
वर्ष 2021 मध्ये सूर्य ग्रहण -
वर्ष 2021 मध्ये दोन सूर्य ग्रहण पडणार असून पहिले ग्रहण 10 जून आणि दुसरे ग्रहण 10 डिसेंबर 2021 रोजी होईल.