रविवार, 22 डिसेंबर 2024
  1. लाईफस्टाईल
  2. खाद्य संस्कृती
  3. गोडधोड
Written By
Last Updated : शुक्रवार, 12 ऑगस्ट 2022 (08:51 IST)

Khajoor Halwa आरोग्यवर्धक खजूर शिरा

गोड खाणं कोणाला आवडत नाही आणि जर गोष्ट शिऱ्याची असेल तर काय सांगायचे. रव्या पासून ते गाजर आणि मुगाचा शिरा तर सर्वांनीच खालला असणार पण आपण कधी खजूराचा शिरा खाल्लेला आहे का? हिवाळ्यात हे खाल्ल्याने शरीरास उष्णता मिळते. चला तर मग करू या खजूराचा शिरा.

साहित्य -
200 ग्रॅम खजूर, 1 कप दूध, दीड कप पिठी साखर, 1/4 कप साजूक तूप, 100 ग्रॅम काजू, 1 लहान चमचा वेलची पूड.  
 
कृती - 
सर्वप्रथम एका भांड्यात दूध गरम करायला ठेवा आणि त्यामध्ये खजूर देखील घाला. उकळी येऊ द्या. दूध घट्ट झाल्यावर गॅस कमी करा. एका वेगळ्या पॅनमध्ये थोडंसं तूप गरम करा. त्यामध्ये काजू परतून घ्या. खजूराचे मिश्रण घट्ट झाल्यावर या मध्ये पिठी साखर, तूप, आणि काजू घाला. मिश्रणाने पॅनचे कडे सोडल्यावर त्यामध्ये वेलची पूड घाला. एका भांड्यावर तूप लावा मिश्रण टाकून सेट होण्यासाठी ठेवा. मिश्रण थंड झाल्यावर समजावं की शिरा तयार झाला आहे. शिरा खाण्यासाठी सर्व्ह करा.
 
हे लक्षात ठेवा -
* खजूराला दुधात टाकताना लक्षात ठेवा की दूध या पूर्वी गरम केलेले असावे नाही तर दूध फाटण्याची शक्यता असते.
* शिरा आपण 3 दिवस पर्यंत फ्रिजमध्ये ठेवू शकता.
*खजूराच्या शिऱ्याला काही आकार द्यावयाचे असेल तर शिरा थंड होऊ द्या मगच काही आकार द्या नाही तर गरम असताना दिल्यावर त्याचे आकार बिघडू शकतो.
* खजूराचा शिरा बनविण्यासाठी नेहमी फुल क्रीमच्या दुधाचाच वापर करावा.